sharad pawar
sharad pawar sakal
पुणे

साधना सहकारी बँकेच्या इमारतीचे शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन

कृष्णकांत कोबल

हडपसर : देशाच्या एकूण सहकारामध्ये केवळ महाराष्ट्र व गुजरातचे योगदान सुमारे साठ टक्के आहे. सध्या देशाचे प्रमुखपद मोदी यांच्याकडे तर नव्याने निर्माण केलेले सहकार मंत्रीपद त्यांचेच सहकारी शहा यांच्याकडे आहे. त्यामुळे ते सहकार उध्वस्त करू शकत नाहीत. रिझर्व्ह बँक मात्र आपले जाचक नियम लादून सहकार संपवू पाहत आहे. सामान्य माणसाला सन्मान मिळवून देणारी सहकार ही एक विचारधारा आहे. ती टीकवण्यासाठी वाट्टेल तो त्रास सहन करण्याची आमची तयारी आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.

येथील साधना सहकारी बँकेच्या अमनोरा पार्कटाऊन येथे उभारण्यात आलेल्या प्रशासकीय मुख्य कार्यालयाची नवीन इमारत, माजी खासदार श्रध्देय विठ्ठलराव तुपे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व बँकेच्या साडेसतरानळी येथील शाखेचे स्थलांतर खासदार शरद पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पद्मश्री डॉ. सुदाम काटे अध्यक्षस्थानी होते. चेअरमन अनिल तुपे यांनी प्रास्ताविक केले.

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सिटी कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे, बँकेचे सुकाणू समिती सदस्य आमदार चेतन तुपे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दिलीप तुपे, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, जगन्नाथ शेवाळे, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश घुले, प्रकाश म्हस्के, कात्रज दूध संघाचे संचालक गोपाळ म्हस्के, माजी जिल्हापरिषद सदस्य दिलीप घुले, नंदकुमार घुले, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, वैशाली बनकर, प्रशांत जगताप, माजी उपमहापौर निलेश मगर यांच्यासह संचालक सुरेश घुले, चंद्रकांत कवडे, बबन मगर, रमेश घुले, प्रवीण तुपे, दिनकर हरपळे, सुभाष काळभोर, डॉ. सिद्राम राऊत, वंदना काळभोर, बाळासाहेब गुजर, बाळासाहेब कोळपे, राजेश कवडे, रोहिणी तुपे, शंकर बडदे, योगेश भगत, भाऊ तुपे, मुख्य कार्यकारी अधिकारी चारूचंद्र सोहोनी, सहाय्यक महाव्यवस्थापक संजय शेवकर आदी यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, "बँकांमध्ये बाकीचे उद्योग न आणता आर्थिक आरोग्य सांभाळण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. साधना बँकेने हे तत्व सांभाळले असून सहकारातील इतर संस्थांनी आदर्श घ्यावा. हा भाग राजकीय दृष्ट्या प्रगल्भ आहे. येथील सर्वच पक्ष व मंडळी '

सहकार परिषदेचे अध्यक्ष अनास्कर म्हणाले, "आरबीआयच्या दृष्टीने सहकारी बँकांना व्यवहार जमत नाहीत. हा त्यांचा गैरसमज आहे. सहकार संविण्याचे धोरण खपवून घेतले जाणार नाही. त्यासाठी प्रसंगी न्यायालयीन लढाई लढू. राज्यात सहकार क्षेत्रात मोठे काम करण्यास वाव आहे. त्यामुळे साधना बँकेने मल्टीस्टेट होण्याचे मागे न लागता शेड्यूल्डसाठीच प्रयत्न करावे. सहकार चालविणे, टिकवणे व वाढवण्याचे काम विश्वासार्हतेतूनच होऊ शकते. त्याचा विचार या क्षेत्रातील व्यक्तींनी करावा.'

आमदार तुपे म्हणाले, "सहकाराबरोबरच सामाजिक जाणीवेचे कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम पवार साहेबांनी केली आहे. आता काही नतदृष्ट मंडळी सहकारी चळवळीला नख लावायचे काम केले आहे. यातून तावून सुलाखून सुवर्णमहोत्सवापर्यंत बँकेला शेड्यूल्ड दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न करू.' प्रा. नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले. व्हाईस चेअरमन हनुमंत कापरे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT