pune crime news:  esakal
पुणे

पुण्यात गोळीबाराच्या घटना सुरुच... सुरक्षा रक्षक पुरविण्यावरून एकावर गोळीबार तर व्यावसायिकाच्या मुलावर रोखले पिस्तूल

pune crime news: अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: व्यावसायिक वादातून एकाने पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना हडपसरमधील शेवाळवाडी परिसरात बुधवारी सकाळी घडली. गृहनिर्माण सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या वादातून हा प्रकार घडला. या गोळीबारात जयवंत बापूराव खलाटे (वय ५३, रा. भेकराईनगर, हडपसर) जखमी झाले आहेत.

या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुधीर रामचंद्र शेडगे आणि त्यांचा मुलगा ऋषिकेश सुधीर शेडगे (रा. शेवाळवाडी) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुधीर शेडगे आणि जयवंत खलाटे हे दोघे लष्करातून सेवानिवृत्त झाले आहेत. ते दोघेही सुरक्षा रक्षक एजन्सी चालवितात. बुधवारी सकाळी शेवाळवाडीतील नंदिनी ड्रीम सोसायटीसमोर सुरक्षा रक्षक भरतीवरुन शेडगे आणि खलाटे यांच्यात वाद झाला. त्यावेळी शेडगे यांनी पिस्तुलातून खलाटे यांच्या पायावर गोळी झाडली. खलाटे यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींना ताब्यात घेतले. (Pune Crime News)

पिस्तूल बाळगणाऱ्या गुन्हेगारांची झाडाझडती-

अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त कार्यालयात मंगळवारी बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली.

बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या सराइतांची चौकशी करून त्यांना तंबी देण्यात आली. पुण्यात गोळीबाराच्या घटना घडू नयेत, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी सराईत गुन्हेगारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर रोखले पिस्तूल-

दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धीरज दिनेशचंद्र अरगडे (वय ३८, रा. खडकी) यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु पिस्तुलातून गोळी फायर न झाल्यामुळे अरगडे बचावले. ही घटना जंगली महाराज रस्त्यावरील मोबाईल शोरूमजवळ मंगळवारी सायंकाळी घडली.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेशचंद्र अरगडे बांधकाम व्यावसायिक आहेत. धीरज त्यांचा मुलगा असून, त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. धीरज अरगडे सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मोटारीतून घरी निघाले होते.

त्यावेळी मोटारीजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी मागे बसलेल्या तरुणाने धीरज यांच्यावर पिस्तुल रोखले. त्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. परंतु चाप ओढला गेला नाही. त्यावेळी घाबरलेल्या धीरज यांनी आरडाओरडा केला. त्यामुळे हल्लेखोर अरगडे हाईट्स इमारतीच्या गल्लीतून महापालिकेच्या दिशेने पसार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यात येत असून, पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sheikh Hasina: १५० हून अधिक खटले, फाशीची भीती... तरीही शेख हसीना डिसेंबरमध्ये बांग्लादेशात का परतणार? जाणून घ्या कारण...

MD Drugs Crackdown: रत्नापूर प्रकरणानंतर राज्यात एमडी ड्रग्जचे जाळे उघड; अमरावती, कोल्हापूर, जळगाव, कळंब येथेही जप्ती

Shehbaz Sharif: ''भारताच्या बेकायदेशीर कारवाईला सात वर्षे पूर्ण, पण...'', 'कलम 370'वरुन पाकच्या पंतप्रधानांचे भारतावर गंभीर आरोप

Land Scam : बनावट कागदपत्रांद्वारे कोट्यवधींची जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

Cooperative Scam: पतसंस्थेतील आठ लाखांची बचत बुडाल्याचा धक्का; मानसिक तणावातून शेतकऱ्याची गळफास घेऊन जीवन संपविले.

SCROLL FOR NEXT