Basmati_Rice.jpg 
पुणे

...म्हणून बासमती तांदळाच्या दरात झाली वाढ

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगातील प्रत्येक देशाने खाद्यान्न वस्तूंचा साठा वाढविण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या काही महिन्यात भारतातून बासमती व इतर तांदळाची निर्यात जवळपास २० टक्क्यांनी वाढली आहे. त्यामुळे बासमती तांदळामध्ये १० टक्क्यांनी दर वाढ झाली आहे. दर्जानुसार एका क्विंटलमागे साधारणतः ७०० ते ९०० रुपये दर वाढ झाली आहे.

सरबती, सुगंधा तांदुळाची निर्यात आफ्रीकन देशांमध्ये...

दरवर्षी भारतातून पारंपारिक बासमतीची निर्यात युरोप आणि युरोपियन देशांमध्ये होते. तसेच ११२१, १४०१, १५०९ या बासमती तांदळाची निर्यात प्रामुख्याने इरान, इराक, दुबई, बाहरीन, साऊदी याठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. तसेच सरबती व सुगंधा तांदुळाची निर्यात ही आफ्रीकन देशांमध्ये होत आहे. सध्या जगभरातील या देशासह अनेक देशांनी देशातील तांदळाचा साठा वाढविण्याच्या दृष्टीने भारतातली तांदळाच्या खरेदीला पसंती दिली आहे.

मागणी वाढल्याने दरामध्ये वाढ

मागणी वाढल्याने ११२१ व १४०१ तांदुळामध्ये स्टीम व सेला प्रकारामध्ये साधारण ६०० ते ९०० रुपये वाढ झाली आहे . तसेच सरबती व सुगंधामध्ये ४०० ते ५०० रुपये प्रति क्विंटल वाढ झाली आहे. झाली असल्याची माहिती मार्केट यार्डातील तांदळाचे व्यापारी राजेंद्र बाठिया यांनी दिली.

देशातील हॉटेल व्यवसाय अद्याप पूर्णत : सुरु झालेला नाही. तसेच लग्नकार्यामध्ये सिमीत संख्यांचे नियम आहेत. तसेच श्रावण महिन्यामध्ये मांसाहार खाणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. त्यामुळे बिर्याणीच्या खपामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे देशातील तांदळाची मागणी तुलनेने कमी आहे. तांदळाचा नवीन हंगाम सुरु होण्यास अद्याप ५ महिने बाकी आहेत. येणाऱ्या हंगामासाठी चांगला पाऊस अपेक्षित आहे. त्यामुळे भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर येईल. शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होईल असे बाठिया यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तांदळाचे घाऊक बाजारातील क्विंटलचे भाव 
पारंपारिक बासमती - ९००० ते १००००
११२१ बासमती - ८००० ते ८५००
१४०१ बासमती -७००० ते ७५०० 
सुगंधी बासमती - ६००० ते ६५०० 
सरवती बासमती - ५००० ते ५५०० 

तांदळाची एप्रिल २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत एकूण झालेली निर्यात 
बासमती - ३२, ९८, ४४१.४२ मॅट्रीक टन 
नॉन बासमती - ४०, १४, ९०८.३७ मॅट्रीक टन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT