Increase in toll on Pune-Mumbai Expressway  
पुणे

नागरिकांनो, पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे'चा प्रवास महागणार कारण...

सकाळवृत्तसेवा

लोणावळाः  मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर टोलच्या दरात मोठी दरवाढ करण्यात आली आहे. तर टोलवसूलीसह महामार्गाचे देखभाल दुरुस्तीचे कंत्राट पुन्हा एकदा आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडे आले आहे. १ एप्रिल पासून नवीन टोलचे दरपत्रक लागू होणार असल्याची माहीती आहे. तर नव्या नियमानुसार कारचालकांना द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार असून हलक्या मोटारींच्या टोलमध्ये चाळीस रुपयांची वाढ झाली असून टोल २३० रुपयांवरुन २७० रुपयांवर गेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा

मिनीबस साठी टोल ३५५ वरुन ४२० तर ट्रक आणि अवजड वाहनांसाठी ४९३ रुपयांवरुन ५८० रुपये करण्यात आला आहे. मोठ्या बसगाड्यांसाठी ६७५ रुपयांवरुन ७९७ आणि क्रेन आणि मल्टी अॅक्सल १८३५ रुपये आकारण्यात येणार आहे. नव्या दरवाढीमुळे पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मात्र फटका बसणार आहे. 

चालक हॅन्डब्रेक न लावताच बसमधून उतरला अन् उतरावरुन...

टोलवसूली पुन्हा 'आयआरबी' कडे
द्रुतगती मार्गाच्या उभारणीपासून देखभाल दुरुस्ती व टोल आकारणीचे कंत्राट आयआरबी कंपनीकडे होते. काही महिन्यांपूर्वी सदर कंत्राट सहकार ग्लोबल कंपनीला देण्यात आले होते. महाराष्ट्र स्टेट बोर्ड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांनी सोमवारी आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर यांना पुढील पंधरा वर्षांसाठी टोल वसूली करण्याचे अधिकार दिले आहेत. नव्या करारानुसार आयआरबी इन्फास्ट्रक्चर कंपनीकडून ८ हजार २६२ कोटी रुपये रस्ते विकास महामंडळास मिळणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT