Increasing heat in summer leads to gas leakage and the cause of the cylinder explosion
Increasing heat in summer leads to gas leakage and the cause of the cylinder explosion 
पुणे

...म्हणून वाढतायेत गॅस गळती आणि सिलेंडर स्फोटाच्या घटना; अशी घ्या काळजी

सकाळवृत्तसेवा

पुणे: पावसाळा, हिवाळा या ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यात वातावरणामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन सिलेंडर किंवा त्यावरील पाईपमधून होणाऱ्या  गॅस गळतीद्वारे सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना घडत असल्याचा निष्कर्ष अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी काढला आहे. मागील नऊ वर्षात शहरात तब्बल एक हजार १७३ सास गळती व सिलेंडर स्फोटाच्या घटना घडल्या आहेत, बहुतांश घटना उन्हाळ्यात घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी गॅस सिलेंडर बाबत काळजी घेण्याची गरज आहे असल्याचे आवाहन अग्निशामक दलाने केले आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
बालेवाडी येथे एका हॉटेलमध्ये कामगार शनिवारी रात्री स्वतःसाठी जेवण बनविताना गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन त्यामध्ये ५ कामगार जखमी झाले. तर जानेवारीमध्ये खराडी येथील संभाजीनगर मध्ये सकाळी गॅस पेट वित असताना गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन कामगार दाम्पत्य व त्यांचे ६ महिन्याचे बाळ गंभीर जखमी झाले होते. याच पद्धतीने प्रत्येक महिन्यात किमान पाच ते दहा घटना घडत आहेत.

पिंपरीतील पाॅझिटिव्ह संख्या 35; एकाच दिवशी आढळले सहा रुग्ण
या स्वरूपाच्या गॅस गळतीमुळे सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. बहुतांश घटना या उन्हाळा सुरू झाल्यानंतर घडल्याचे मागील काही वर्षात घडलेल्या घटनांवरून दिसून येते. बऱ्याचदा या घटना पहाटे किंवा सकाळी घडत असल्याचे आत्तापर्यंत दिसून येत होते. मात्र मागील काही वर्षापासून हे चित्र बदलत असल्याचे अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

खडकी कॅन्टोन्मेंट भाजी मंडई पॅटर्न ठरतोय आदर्श
उन्हाळा वाढल्यानंतर हवेतील उष्णता मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होत. त्यामुळे घरातील वातावरणही उष्ण होते. त्यामुळे सिलेंडर गरम होऊन सिलेंडरचे तोंड किंवा पाईपच्या माध्यमातून गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट होण्याच्या घटना वाढत असल्याचे अग्निशामक दलाचे मुख्य अधिकारी प्रशांत रणपिसे यांनी सांगितले.
 
लायगुडे रुग्णालयात सुधारणा; 'क्वारंटाईन' नागरिकांना दिलासा
२०११ पासून आत्तापर्यंतच्या गॅसगळती व सिलेंडर स्फोटाच्या घटना

२०११ -११९
२०१२ - १४८
२०१३ - ९७
२०१४ - १५२
२०१५ - १०४
२०१६ - १५१
२०१७ - १४८
२०१८ - ११८
२०१९ - १३६
२०२० (१० एप्रिलपर्यंत) - 

लायगुडे रुग्णालयात सुधारणा; 'क्वारंटाईन' नागरिकांना दिलासा

गॅसगळती व सिलेंडरचा स्फोट टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

-उन्हाळ्यात गॅस सिलेंडर थंडावा असलेल्या ठिकाणी ठेवा
-झोपण्यापुर्वी सिलेंडरचे रेग्युलेटर बंद करुन ठेवा 
-रेग्युलेटरला अडकविलेले पांढरे झाकण लावा 
-गॅसचा वास आल्यास काडीपेटी, रेग्युलेटर पेटवू नका 
-पंखे, बल्ब किंवा कोणतीही इलेक्‍ट्रॉनिक वस्तु सुरू करु नका अथवा बंद करू नका
-घरातुन बाहेर जाण्यास प्राधान्य द्या 
-दरवाजे, खिडक्‍या तत्काळ उघडून गॅसचा वास घालवा 
-गॅसचा वास जाइपर्यंत घरात जाऊ नका
-गॅस ने पेट घेतल्यास भिजवलेली चादर, टॉवेल सिलेंडर भोवती गुंडाळा. 
-गॅस गळती झाल्यास सिलेंडर घराबाहेर किंवा मोकळ्या जागेत ठेवा
-तत्काळ अग्निशामक दलास खबर द्या.

Lockdown : ऑनलाईन सेवेद्वारे केवळ जीवनावश्यक वस्तुंचाच पुरवठा होणार
"पावसाळा, हिवाळा या ऋतुंच्या तुलनेत उन्हाळ्यातील अधिक उष्णतेचा परिणाम आपल्या घरातील गॅस सिलेंडरवर होत असतो. त्यामुळे सिलेंडरचे झाकण किंवा पाईप यांच्याद्वारे गॅस हळूहळू बाहेर पडतो. त्याचवेळी आपल्याकडून गॅस सुरू करणे किंवा विजेची बटणे सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आग लागते. पूर्वी फक्त पहाटे किंवा सकाळी या घटना घडत होत्या, परंतु आता उन्हाळ्यातील उष्णतेमुळे गॅस गळती होऊन सिलेंडरचा स्फोट होणे किंवा आग लागणे, अशा घटना पहाटे, दिवसा, रात्री अशा कोणत्याही वेळी होऊ लागल्या आहेत."
- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशामक अधिकारी.
शिक्षणमंत्री म्हणतात, परीक्षा रद्द; अन् हे मुख्याध्यापक म्हणतात, परीक्षा घेणारच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT