मोहोळचे आमदार यशवंत माने  Sakal
पुणे

इंदापूर बाजार समितीचे उलाढाल ३०० कोटीवर; आमदार मानेंची माहिती

कळंबमधील उपबाजारामध्ये बळीराजा सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

राजकुमार थाेरात

वालचंदनगर : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उलाढाल ३०० कोटीवरती पोहचली असून शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीचे कारभार सुरु आहे. शेतकऱ्यांना माफक दरामध्ये सुविधा मिळण्यासाठी १ कोटी ६५ लाख रुपये खर्चुन १७ हजार चौरसफुटाचे बळीराजा सांस्कृतिक भवन सुरु केले असल्याची माहिती मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी दिली.

कळंब (ता.इंदापूर) येथे बाजार समितीच्या उपबाजारामध्ये सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय फडतरे, संचालक मधुकर भरणे,नीरा-भिमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार, माजी सभापती विलास माने, प्रदीप पाटील, कालिदास देवकर,भाऊसाहेब सपकळ, अंकुश रणमोडे, रोहित मोहोळकर, संग्राम निंबाळकर, राजेंद्र गायकवाड,तानाजी थोरात, वालचंदनगर चे सरपंच कुमार गायकवाड, सचिव वैभव दोशी उपस्थित होते. यावेळी माने यांनी सांगितले की, राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व जिल्हा बॅंकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्यामुळे बाजार समितीची निवडणूक लढलो व उपसभापती झालो. बाजार समितीचा उपसभापती झाल्यामुळे माझे नाव राज्यामध्ये पोहचले.

देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,खासदार सुप्रिया सुळे यांनी संधी दिल्यामुळे मोहोळाचा आमदार होण्याचा बहुमान मिळाला. बाजार समितीमध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस व कॉग्रेस (सध्याचे भाजप) चे संचालक असतानाही आम्ही सर्व संचालकांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र येवून बाजार समितीचा कारभार पाहत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आप्पासाहेब जगदाळे यांच्या संकल्पनेतून घोडे बाजार सुरु करण्यात आला.याचा फायदाही बाजार समितीला झाला असल्याचे सांगितले.

भव्य शॉपिंग सेंटर उभारणार : जगदाळे

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी सांगितले की, इंदापूर तालुक्यामध्ये डाळिंबाचे उत्पादन घटत आहे.तसेच भुसाराचे उत्पादन कमी झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने जोड धंदे सुरु केले आहेत. पेट्रोल पंप सुरु केल्यामुळे उत्पादनामध्ये वाढ झाली आहे. येत्या काही दिवसामध्ये इंदापूर व भिगवणे भव्य शॉपिंग मॉल सुरु करण्यात येणार असून याचा फायदा तालुक्यातील नागरिकांना होईल.तसेच दुष्काळामध्ये शेतकऱ्यांसाठी बाजार समितीने चारा छावण्या सुरु केल्या.यामध्ये सुमारे ३१०० जनावरे होती.याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असून सुमारे ४० लाख रुपयांचे उत्पन्न बाजार समितीला मिळाल्याचे जगदाळे यांनी सांगितले.

पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रेय फडतरे यांनी सांगितले की,इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून बाजार समितीचा कारभार सुरु आहे. सर्व संचालकांना विश्‍वासात घेवून बाजार समितीचे कामकाज सर्वांनी पाहिले. बाजार समितीकडे भुसाराचा शेष कमी होत असल्याने बाजार समितीने विविध नाविण्यपूर्ण व्यवसाय सुरु करुन बाजार समितीचे उत्पन्न वाढविले असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT