माहिती अधिकार  sakal
पुणे

८ माहिती अधिकार अपीला पैकी सात अपीलकर्त्यांची सर्व अपीले निकाली

इंदापूर पंचायत समितीत आयोजित पहिल्या तक्रार निवारण दिनात ८ माहिती अधिकार अपीलापैकी सात अपीलकर्त्यांची सर्व अपीले निकाली निघाली

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : इंदापूर पंचायत समितीत आयोजित पहिल्या तक्रार निवारण दिनात ८ माहिती अधिकार अपीलापैकी सात अपीलकर्त्यांची सर्व अपीले निकाली निघाली तर १० पैकी ९ उपस्थित तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेवून योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी इंदापूर पंचायत समितीच्या लोकनेते शंकररावजी पाटील सभागृहात तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीगटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.

इंदापूर पंचायत समितीत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग मुंबई यांच्या निर्देशानुसार शुक्रवार दि.१ ऑक्टोबर रोजी तक्रार दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यास नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.

विजयकुमार परीट पुढे म्हणाले, ज्या नागरिकांच्या काही समस्या असतील, त्यांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात पुराव्यासह इंदापूर पंचायत समिती कार्यालयाकडे द्याव्यात तसेच प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी तक्रार निवारण दिनी स्वतः उपस्थित राहून आपल्या प्रश्नाचे निराकरण करून घ्यावे. नागरिकांच्या तक्रारी,अडचणींची सोडवणूक करण्यासाठी पंचायत समिती कार्यालयात लेखी तक्रार दिलेल्या सर्व तक्रारदारांना सभे पूर्वी ८ दिवस अगोदर तक्रार निवारणदिनाची माहिती देण्यात येईल. तक्रारदारांनी आपल्या रास्त समस्यांचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण दिनाचा फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.

यावेळी सहायक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे, बांधकाम उपअभियंता एस.एस.कुपल ,सर्व संबंधित विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident Side Story : कोल्हापूर अपघात घटना, तिघांच्या मृत्यूने गाव हळहळलं; फुलांच्या माळा, मिठाईचे डबे, दिवाळी खरेदी पिशव्या पाहून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू...

Bhau Beej Travel: भाऊबीजच्या दिवशी भावाला घेऊन जा 'या' खास ठिकाणी; आठवणी ठरतील खास!

Diwali Padwa 2025 Marathi Wishes: नात्यात सदा राहो गोडवा, नवऱ्याला पाठवा दिवाळी पाडव्याचा मराठीतून खास शुभेच्छा

Viral News : ही बाई आहे की हैवान? गाढ झोपलेल्या नवऱ्यावर टाकले उकलते पाणी, नंतर अ‍ॅसिडने केला हल्ला, धक्कादायक कारण समोर...

Gold Rate Today : दिवाळी पाडव्यादिवशी सोन्या-चांदीत घसरण; तुमच्या शहरातील नवीन भाव काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT