Indian Student In Ukraine Sakal
पुणे

"आई तू काळजी करू नकोस, मी इथे सुखरूप आहे"; युक्रेनमधून आईला धीर

रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे दौंड तालुक्यातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत.

रमेश वत्रे

केडगाव (जि. पुणे) : ''आई तू काळजी करू नकोस, मी इथे सुखरूप आहे. मोबाईल रिचार्च होत नाही. मोबाईलची बॅटरी टिकवून ठेवायची आहे. त्यामुळे सारखा संपर्क करू शकत नाही.'' असा धीर तेजस दिनेश मोहिते याने आपल्या आईला युक्रेनमधून दिला आहे. दौंडमधील सात विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थी सुखरूप पोहचले आहेत. एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे. (Indian Student In Ukraine)

केडगाव ( ता.दौंड ) येथील राष्ट्रवादी काँग्रेसप्रणित डॅाक्टर सेलच्या अध्यक्षा डॅा.वंदना मोहिते यांचा मुलगा तेजस ( वय १९ ) हा युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. रशिया व युक्रेनच्या युद्धामुळे दौंड तालुक्यातील सात विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यामुळे पालकांचे जीव टांगणीला लागले आहेत. तेजससह दिग्विजय दशरथ माळी ( दौंड ), ऋत्विक रमेश शिर्के, ऋतुजा रमेश शिर्के, प्रतिक रमेश शिर्के ( सर्व रा. दौंड ), अविष्कार अरूण मुळे ( केडगाव ), पीयुष विकास थोरात ( पिंपळगाव ) हे विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत आहे. यापैकी अविष्कार मुळे व ऋत्विक शिर्के हे भारतात पोहचले आहे.

सकाळशी बोलताना तेजस मोहिते म्हणाला, सीमेपासून आम्ही सातशे किलोमीटर आतमध्ये आहे. सीमा ओलांडली की आम्ही सुखरूप होऊ. मात्र सीमा ओलांडण्यास अनेक समस्या आहेत. सध्या ज्यूस व चीप्स खाऊन दिवस काढत आहोत. आईला सांगा काळजी करू नको, मी सुखरूप आहे.

याबाबत डॅा. मोहिते म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या स्थलांतरासाठी मी ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. मात्र विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी केंद्र सरकारने उशीरा हालचाली सुरू केल्याने समस्या आणखी गंभीर बनत आहे. कालपासून मदतीच्या हालचालींना वेग आला आहे. आमची झोप उडाली असून टिव्हीसमोरून उठू वाटत नाही. तेथील घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे.

याबाबत आमदार राहुल कुल म्हणाले, सर्व नातेवाईकांना संपर्कात आहे. विद्यार्थ्यांना सुखरूप आणण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्याशी बोलत आहे. सर्वजण सुखरूप पोहचतील. प्रयत्न चालू असून पालकांनी धीर सोडू नये. काही मदत लागली तरी नातेवाईकांनी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update: १५ वर्षांनंतर बंगालमध्ये घडणार मोठा राजकीय उलटफेर? भाजपची १६० जागांवर आघाडी

Nagpur News: ट्रांझिट बेलनंतरही अटकपूर्व जामिनाचा हक्क नाही; उच्च न्यायालय : बहुचर्चित किडनी विक्री प्रकरणात डॉ. सिंगला दणका

Vijay Thalapathy TVK Party : विजय थलपथीचा तामिळनाडूच्या राजकारणात 'मास्टर' स्ट्रोक! पहिल्याच निवडणुकीत मोठी आघाडी

Tamil Nadu Election Result Update : लाडक्या बहिणींनी विजय थलपतीला तारलं, लग्नात मुलींना मिळणार आता ८ ग्रॅम सोने; थलपतीचा महाराष्ट्र पॅटर्न चर्चेत

AC vs Cooler vs Fan : एसी, कूलर की पंखा...उन्हाळ्यात काय आहे बेस्ट? महिन्याला किती बिल येतं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT