Indigo will give 50 thousand to passengers as the Indemnification due to Cockroach found in the plane 
पुणे

विमानात झुरळ निघाले म्हणून इंडिगो देणार प्रवाशांना 50 हजार

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे ते दिल्ली विमान प्रवास करताना आसनाखाली झुरळ निघाल्याने झालेल्या त्रासापोटी दोन प्रवाशांना मिळून 50 हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश ग्राहक मंचाने इंडिगोला दिला. तिकिटाचे आठ हजार 500 रुपये देखील नऊ टक्के व्याजदराने परत द्यावेत, असे मंचाचे अध्यक्ष उमेश जावळीकर, क्षितिजा कुलकर्णी, संगीता देशमुख यांनी दिलेल्या निकालात नमूद आहे.

विमान प्रवासी स्कंद असीम बाजपेयी (रा. कोथरूड) आणि सुरभी राजीव भारद्वाज (रा. वनराई हाईट्‌स, कोथरूड) यांनी यासंदर्भात ग्राहक मंचात गेल्या वर्षी दावा इंटरग्लोब एव्हिअेशन लिमिटेड (इंडिगो) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्या विरोधात दावा दाखल केला होता.

बाजपेयी आणि भारद्वाज 31 डिसेंबर 2018 रोजी पुणे विमानतळावरून इंडिगोच्या विमानातून दिल्लीला गेले होते. प्रवासात आसनाखाली झुरळ निघाल्याने त्यांनी तातडीने तो भाग निर्जंतुकीकरण करण्याची विनंती केली. विमानातील कर्मचाऱ्यांना निर्जंतुकीकरण करणे शक्‍य न झाल्याने त्यांनी याबाबतची तक्रार मोबाईल संदेश तसेच ई-मेलद्वारे नोंदविण्यास सांगितले. त्यानंतर दिल्ली विमानतळावर विमान उतरल्यानंतर त्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दिली. त्यावेळी विमान प्रवासात झुरळ निघणे ही गंभीर बाब नसून तक्रारदाराची तक्रार गंभीर नसल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले. त्यानंतर बाजपेयी आणि भारद्वाज यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली.

माझ्या हाताला जखम झाली होती. झुरळापासून बचाव करताना मला वेदना झाल्या, असे बाजपेयी यांनी तक्रारीत म्हटले होते. तर मला संसर्गजन्य आजार असल्याने झुरळाचा त्रास झाला, असे भारद्वाज यांनी तक्रारीत म्हटले होते. याबाबत तक्रार करूनही योग्य ती दखल न घेतली नाही. त्यामुळे नुकसान भरपाई आणि तक्रार खर्चाची रक्कम देण्याची विनंती बाजपेयी आणि भारद्वाज यांनी केली होती.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT