peacock 
पुणे

कावळ्यांच्या तावडीत सापडली होती जखमी लांडोर...

युनूस तांबोळी

टाकळी हाजी (पुणे) : शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील नागरिकांनी सहा महिन्यांच्या जखमी लांडोरीला (मोर) कावळ्यांच्या तावडीतून वाचवून उपचार करत वनविभागाच्या ताब्यात दिले.

पुण्यातील `या` भागात अवैध व्यावसायिक जोमात
   
शिरूर तालुक्यातील माळवाडी हे टाकळी हाजीमधून नुकतीच नवी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. कुकडी नदी व मीना कालव्यामुळे या परिसरात शेती फुललेली पहावयास मिळते. त्यामुळे सगळीकडे हिरवेगाव वातावरण व डाळिंब व ऊस शेती आहे. मात्र, त्यामुळे या परिसरात बिबट्या, कोल्हे, लांडगे, रानडुक्कर, मोर, लांडोर या बरोबर अनेक पक्षी पहावयास मिळतात. चारा व अन्नामुळे या परिसरात मोरांची संख्या वाढली आहे. शुकवार (ता. 29 मे) वसंत टिळेकर यांनी त्यांच्या शेतात 6 महिन्याच्या लांडोरीला शेतात जखमी अवस्थेत पाहिले. 

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा 

टिळेकर यांनी परिसरातील नागरिकांना बोलावून त्या मोराला कावळ्यापासून वाचविले. तसेच, रमेश टिळेकर, सागर टिळेकर, नीलेश टिळेकर यांच्या मदतीने उचलून घरी आणले. गायींच्या शेडमध्ये कुत्र्यांपासून सुरक्षेसाठी जाळी लावून लांडोरीची राहण्याची तात्पुरती व्यवस्था केली. पशुवैद्यकीय डॉ. नवनाथ टिळेकर यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर वनविभागाच्या ताब्यात दिले. या लांडोरीची तपासणी करून वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवले असून, नंतर जंगलात सोडून देणार असल्याचे वनविभागाने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News: मलकापुरात महामार्ग चार तास ठप्प! 'क्रेनसह उलटलेला कंटेनर केला बाजूला'; पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Sanjay Kaka Patil : संजय काका पाटलांनी थेट रोहित पाटलांना एकत्र लढण्याचं दिल आवाहन, तासगावमध्ये नेमकं काय घडतयं

Whatsapp ला आलं 'सायबर कवच'! ऑन करताच हॅकर्सना बसणार दणका; Strict Account फीचरने फ्रॉड कॉल्सचा प्रॉब्लेम संपवणार, एकदा वापरुन बघाच

Latest Marathi Breaking News Live: दिवसाढवळ्या घरफोड्या, काडतूस, चांदीचे दागिने आणि रोकड चोरी करणारे दोन आरोपी अटकेत

IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स

SCROLL FOR NEXT