zoo.jpg 
पुणे

बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयामधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

सकाळवृत्तसेवा

पिंपरी : संभाजीनगर येथील निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाचे काम अजून पूर्ण झालेले नाही. मात्र, तेथे 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन केले जात असून, चार कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी देखील करण्यात आली आहे.

सुमारे २ वर्षांपासून केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या सल्ल्यानुसार निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणाचे काम सुरु आहे. हे काम जवळपास ७० टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाले आहे. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात हे काम ठप्प झाले आहे. तरी देखील कर्मचारी आणि सर्प, पक्षी यांच्या सुरक्षेसाठी 'सोशल डिस्टन्सिंग'चे पालन केले जात आहे.

प्राणी संग्रहालयाचे डॉ.घनश्याम पवार म्हणाले, "सध्या नूतनीकरणाच्या कामामुळे प्राणी संग्रहालय सर्वसामान्य नागरिकांसाठी बंदच आहे. मात्र, राज्य प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने पशु-पक्षांसमवेत काम करताना कोणती दक्षता घ्यायची यावर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेऊन निर्देश दिले आहेत. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाशीही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यानुसार, संग्रहालयाच्या प्रवेशद्वारावर गाड्या आत आणण्यास मनाई करणारा फलक लावण्यात आला आहे. २१ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे कोणत्या प्राणी-पक्षाचे वर्तनात बदल झाला नाही ना यावर लक्ष ठेवले जात आहे. चार ही कर्मचाऱ्यांची थर्मल स्क्रिनिंग करून त्यांचा रक्तदाब, रक्तशर्करा आदीं वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या अाहेत.''  

संग्रहालयातील पशु-पक्षांना त्यांचे भक्ष्य अथवा दाणा पाणी कमी पडू नये यासाठी दक्षता घेतली जात असून कर्मचाऱ्यांना अत्यावश्यक सेवेचे पासेस देण्यात आले आहेत. या प्राणी संग्रहालयात नाग, घोणस आदी विषारी तर धामण, दिवड, तस्कर, मांडूळ आदी बिनविषारी सापांच्या प्रजाती आहेत. याखेरीज, ३ मगरी आणि १२ ते १३ प्रकारचे पक्षी आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT