interview planned on time of promotion for final year exam pune university 
पुणे

ऐन परीक्षेच्या काळात पदोन्नतीच्या मुलाखतींचा मुहूर्त; कुलगुरूकडे केली 'ही' मागणी

ब्रिजमोहन पाटील

पुणे : एकीकडे अंतिम वर्षाच्या परीक्षांचे नियोजन सुरू असताना दुसरीकडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागाने प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी कॅस (करिअर ऍडव्हान्समेंट स्कीम) अंतर्गत मुलाखती घेण्यासाठी मुहूर्त काढला आहे. त्यास विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांनी विरोध केला आहे. या मुलाखती आत्ताच न घेता ऑक्‍टोबर महिन्यात परीक्षा झाल्यानंतर घ्याव्यात अशी मागणी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे विद्यापीठातर्फे पदवी व पदव्युत्तर पदवीच्या महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिक परीक्षा सुरू आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात घेतल्या जाणार आहेत. ऑफलाइन व ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन- एमसीक्‍यू) पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. प्रश्‍नसंच काढणे, परीक्षेचे नियोजन करणे यात प्राध्यापक गुंतलेले आहेत. असे असताना शैक्षणिक विभागाने 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या कालावधीत कॅस अंतर्गत प्राध्यापकांच्या मुलाखतींचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यास अधिसभा सदस्यांनी विरोध केला आहे. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, सह कार्यवाह जोत्स्ना एकबोटे, अधिसभा सदस्य डॉ. श्‍यामकांत देशमुख, दादाभाऊ शिनलकर, संतोष ढोरे, अभिषेक बोके, शशिकांत तिकोटे, बागेश्री मंठाळकर यांनी ही यासंदर्भात निवेदन दिले आहे. 

डॉ.श्‍यामकांत देशमुख म्हणाले, "प्राध्यापकांची पदोन्नतीसाठी कॅसच्या मुलाखती महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे परीक्षेच्या काळात या मुलाखती ठेवणे योग्य नाही. अन्यथा प्राध्यापक परीक्षेचे काम सोडून स्वतःची फाइल तयार करण्यासाठी वेळ देतील, याचा परिणाम परीक्षेवर होऊ शकतो. परीक्षा झाल्यानंतर या मुलाखती घ्याव्यात अशी मागणी कुलगुरूंकडे केली आहे.'' 
 

(edited by : sharayu kakade)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jowar-Bajra Price Hike : थंडीची चाहूल, ज्वारी-बाजरीला मागणी; बाजारात क्विंटलमागे २०० ते ५०० रुपयांची तेजी

Latest Marathi Breaking News Live : नागपूरमध्ये मोठी राजकीय हालचाल! माजी आमदार बळीराम भाऊ शिरस्कार भाजपात प्रवेश; स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण

Cooking In Space: चिनी अंतराळवीरांनी अंतराळात शिजविले अन्न; अवकाश स्थानकात ताजे जेवण बनविण्याचा प्रयोग यशस्वी

Aundh Hospital Theft : औंध रुग्णालयातून 'शेड्यूल-एच' औषधाच्या २० बाटल्या लंपास; वर्ग ४ कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई

Arunachal Monorail: कामेंग खोऱ्यामध्ये धावणार मोनोरेल; अरुणाचल प्रदेशमध्ये लष्कराच्या ‘गजराज कोअर’ची कमाल

SCROLL FOR NEXT