पुणे

गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी अमेरिकन पद्धतीचा अवलंब हवा : ऍड. उज्ज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा

पुणे : "कायद्यातील पळवाटा शोधून गुन्हेगार निर्दोष सुटतात आणि शिक्षेचे प्रमाण घटते. त्यामुळे गुन्हेगारांना शिक्षा देण्याचे प्रमाण वाढविण्यासाठी तपास करण्याच्या प्रक्रियेत बदल होणे गरजेचे आहे. त्यासाठी अमेरिकन पद्धतीचा अवलंब हवा,'' असे मत विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांनी सोमवारी (ता.१९) व्यक्त केले. 

फौजदारी कायद्याचा आढावा घेत त्यातील लोकाभिमुख बदलांबाबत 'सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठा'च्या 'सिम्बायोसिस विधी महाविद्यालया'ने (एसएलएस) चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी ऍड. निकम बोलत होते. न्यायाधीश शालिनी फणसळकर-जोशी, ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. के. जैन, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे डॉ. अरविंद तिवारी, माजी कुलपती डॉ. एस. सी. रैना, मनोविकार तज्ज्ञ डॉ. हरीश शेट्टी, ऍड. हितेश जैन आणि समाजशास्त्र तज्ज्ञ डॉ. डी. पी. सिंग यांच्यासह केंद्रीय विधी प्राधिकरण मंडळ, संशोधक, सायबर तज्ज्ञ आदींनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले. 

ऍड. निकम म्हणाले, "अमेरिकेत एखादा गुन्हा घडल्यानंतर तपास सुरू असतानाच सरकारी वकील पोलिसांना मदत करतात. त्यामुळे दोषारोपपत्र दाखल करताना कोणतीही त्रुटी राहत नाही. त्यामुळे गुन्हेगाराला कायद्यातील पळवाटांचा फायदा होत नाही आणि शिक्षेचे प्रमाण वाढते. आपल्याकडे उलटी परिस्थिती आहे. त्याचा फायदा घेत गुन्हेगार कायद्यातील पळवाटा शोधून निर्दोष सुटतात. 

चर्चासत्रात अन्य तज्ज्ञांनीही मार्गदर्शन केले. एसएलएसच्या संचालिका आणि अधिष्ठाता डॉ. शशिकला गुरपूर यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. चर्चासत्राद्वारे तज्ज्ञांकडून आलेल्या सूचना आणि ऑनलाइन सार्वजनिक मतदानाच्या आधारे आलेले प्रतिसाद, केंद्रीय गृह मंत्रालयाला पाठविण्यात येणार आहे. 

तपासात राजकीय हस्तक्षेप नको : 
महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली करू नये. तसे झाल्यास तपास अधिकारी आणि सरकारी वकील यांच्यामध्ये समन्वय साधून साक्षीदाराने नेमके काय सांगायचे आहे, गुन्ह्याचा तपास नेमका कसा केला याची सविस्तर माहिती घ्यावी. तपास अधिकाऱ्याची बदली करायची असेल, तर त्याच शहरात करावी. त्यामुळे समन्वय साधने सोपे होईल. तपास कार्यात राजकीय हस्तक्षेप असू नये. तसे झाले तर पोलिस चांगल्या प्रकारे काम करून आरोपीला शिक्षा होईल, असे ऍड. जैन म्हणाले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT