Khadakwasla_Dam 
पुणे

खडकवासला धरणातून पाणी सोडले जाणार; नदीकाठच्या पुणेकरांना दक्षतेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

पुणे : खडकवासला धरणात सुमारे ६१ टक्के पाणीसाठा झाला असून, गुरुवारी दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी (ता.६) दुपारनंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. खडकवासला धरणात बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा होता. या धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, पानशेत ५४ मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

खडकवासला धरणात बुधवारी सायंकाळपर्यंत ६१ टक्के पाणीसाठा होता. गुरुवारी दुपारपर्यंत खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दुपारी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

प्रज्वल रेवन्नाचा आणखी एक कारनामा; तुरुंगात जप्त केलेल्या मोबाइलमध्ये सापडले १४५ हून अधिक अश्लील व्हिडीओ

Social Media Election Rules : निवडणूक प्रचारात डीपफेक व्हिडिओ वापराल तर कारवाई; आयोगाचे राजकीय पक्षांना कडक निर्देश

'मी जे केलं ते तुम्ही करू नका...' सिंगल मदरहुडबद्दल नीना गुप्तांचं स्पष्ट वक्तव्य, म्हणाल्या...

Chanakya Niti: नशीब बदलत नाही म्हणून निराश आहात? चाणक्य नीतीतील ‘या’ २ सवयी आजपासून अंगीकारा!

हरतालिकेची पूजा का करतात? एका क्लिकमध्ये वाचा व्रताचे महत्त्व!

SCROLL FOR NEXT