IT-Employee 
पुणे

'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चांगल्या पगाराची नोकरी मिळते म्हणून आयटीमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र कोरोनामुळे आयटीमधील कामगार हैराण झाले असून अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत. तीन महिने फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या, अशी नोटीस पुण्यातील एका आयटी कंपनीने त्यांच्या 800 कर्मचाऱ्यांना पाठवली आहे.

संबंधित कंपनीकडून कर्मचार्‍यांना पहिल्यांदा पगारी रजा घेण्यात सांगितले. पुढील रजा विना वेतन ग्राह्य धरली जाईल, असे सांगण्यात आले होते. या कर्मचार्‍यासमोर दोन पर्याय ठेवण्यात आले होती. एक तर राजीनामा द्या किंवा पुढील तीन महिने विना वेतन काम करा असे सांगितले होते.

या विरोधात नॅशनल इन्फॉरमेशन टॅक्नोलॉजी एम्प्लाइज सिनेटच्यावतीने कामगार आयुक्तांना निवेदन देण्यात आले होते. त्याची दखल घेत कंपनीला कामगार आयुक्तांनी दणका दिला असून कुठल्याही कर्मचार्‍याला कामावरून काढू नये तसेच त्यांच्या वेतनात कपात करून नये अशा आदेश दिला आहे. कंपनीकडून सुमारे 800 कर्मचार्‍यांना कामावरून काढण्या संदर्भात नोटीस पाठविण्यात आली होती. याच बरोबर पुढील तीन महिण्याचे वेतन देणे बंधणकारक असताना ते त्यांना देण्यात आलेले नाही.

या संदर्भात नॅशनल इन्फॉरमेशन टॅक्नोलॉजी एम्प्लाइज सिनेटच्या वतीने कामगार उपायुक्तांना निवेदन देण्यात आले होते. कंपनीला सरकारी कामगार अधिकारी एस. एच. चौभे यांनी पत्र पाठविले असून कोणत्याही कर्मचार्‍यांना कामावरून कमी करू नये, तसेच त्यांच्या वेतनात कपात करून नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमुद केले असल्याची माहिती सिनेटचे सरचिटणीस हरप्रित सलुजा यांनी दिली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WPL 2026 Winner: स्मृती मानधानाच्या RCB ने इतिहास रचला, दुसऱ्यांदा जिंकले जेतेपद; दिल्ली सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पराभूत

Aishwarya Special Wishes to Abhishek: ऐश्वर्याने अभिषेकला वाढदिवसाच्या दिल्या खास शुभेच्छा; लहानपणीचा फोटो शेअर केला अन् म्हणाली...

WhatsApp Scam : व्हॉट्सॲप ‘गुंतवणूक’ सापळा, तिघांना सव्वा कोटींचा गंडा; व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर बाजारात गुंतवणूक पडली महागात

झेडपीसाठी उद्या मतदान! सोलापूर जिल्ह्यात 8 वर्षांत वाढले 3.27 लाख मतदार; लाडक्या बहिणींचा टक्का वाढला; 2017 मध्ये झाले होते 66.96 टक्के मतदान, वाचा...

Meghalaya Coal Mine Blast : मेघालय हादरलं! अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट, मृतांचा आकडा १८ वर; अनेक अडकल्याची भीती

SCROLL FOR NEXT