weather update rain forecast monsoon Rain continues in this area Vidarbha Marathwada pune
weather update rain forecast monsoon Rain continues in this area Vidarbha Marathwada pune sakal
पुणे

Weather Update: सकाळपासूनच पुणे शहर परिसरात पावसाची संततधार

सकाळ डिजिटल टीम

राज्यात वादळी वाऱ्यासह गारपिठांचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. मागच्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या पिकांचे झालेल्या पावसाने मोठे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे. अशातच राज्याच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

वादळी पावसाचा इशारा देत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दरम्यान काल शनिवार (ता.7) संध्याकाळपासूनच हलक्या स्वरूपाच्या पावसाने पुणे शहर, पिंपरी-चिंचवड परिसरात हजेरी लावली. आकाश मुख्यतः ढगाळ असून शहर व उपनगरात अनेक ठिकाणी हलक्या सरीना पहाटेपासूनच सुरवात झाली आहे.

पावसामुळे उष्णता कमी झाल्यामुळे वातावरण थंड झाले आहे. तर मागच्या काही दिवसांपासून विजा, मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यातील काही ठिकाणी जोरदार गारपिटीमुळे मोठे नुकसान झालं आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

RCB vs CSK : पावसामुळे 5-5 किंवा 10-10 ओव्हरचा सामना झाला तर कसे असेल RCBचे गणित? जाणून घ्या समीकरण

Mallikarjun Kharge : ''राज्यात 'मविआ'ला कमीत कमी ४६ जागा मिळतील'' खर्गेंचा दावा; इंडिया आघाडीची पत्रकार परिषद

SCROLL FOR NEXT