पुणे

पुण्यात वेगवान वाऱ्यासह पावसास सुरुवात

विनायक होगाडे

पुणे : मोठ्या वेगवान वाऱ्यासह पुण्यात पावसाला सुरवात झाली आहे. पाऊस कमी आहे मात्र वाऱ्याचे प्रमाण जास्त आहे. पुण्यात तसेच पुण्यातील उपनगरांमध्ये पावसास सुरुवात झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात सायंकाळी पाऊस पडण्याचं सत्र सुरु आहे. मात्र, आज रात्री पडणाऱ्या पावसामागे तौत्के वादळाचे कारण आहे, असा अंदाज आहे.

अरबी समुद्राच्या (Arabian Sea) नैऋत्य भागात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ‘तौत्के’ (Tauktae) चक्रीवादळ (Cyclone) निर्माण झाले आहे. या वादळामुळे केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र ही चार राज्य अलर्ट मोडवर आहेत. १८ मे ला हे वादळ गुजरातच्या किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याने आगामी पाच दिवसांचा अंदाज जाहीर केला असून यात गोवा आणि कोकणातील काही भागात याशिवाय रविवारी गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ताशी ५० ते ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील, असाही हवामान खात्याचा अंदाज आहे.

पुण्यात या ठिकाणी पडतोय असा पाऊस:

  • रामटेकडी भागांत जोरदार वारे सुरू झाले आहे, त्यात रामटेकडी परीसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे.

  • हडपसरमधे जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात!

  • किरकटवाडी परिसरात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग वाढत असून वीजा चमकत आहेत.

  • आज बाणेर बालेवाडी परिसरात दिवसभरच खूप उकाडा जाणवत होता. संध्याकाळ पासून आकाशात ढग जमा झाले होते. सध्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे.

  • कोथरूड परिसरात रिमझिम पाऊस येऊन गेला, सध्या वारे सुरू आहे. वीजा चमकत आहेत.

  • सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव धायरी, नऱ्हे भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू मोठ्या प्रमाणावर विजेचा कडकडाट सुरू आहे.

  • वारजेत जोरदार वाऱ्यासह पाऊसाला सुरुवात झाली आहे. मात्र वारे जास्त असल्याने पाऊसाचे प्रमाण कमी आहे.

  • हडपसर मांजरी परिसरात जोरदार वारे मात्र, पाऊस तुरळक, रस्त्यावर पालापाचोळा, प्लॅस्टिक कचरा विखूरला.

  • कात्रज कोंढवा रस्ता, गोकुळनगर परिसरात जोरदार वारे सुरू झाले आहे. काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडीत झाला असून पावसाला सुरुवात झाली आहे.

  • औंध, बाणेर रस्ता, औंधरस्ता, बोपोडी, पाषाण,सूस,महाळुंगे परिसरात जोरदार वा-यासह पाऊस सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 52 अंकांच्या वाढीसह बंद; सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये जबरदस्त वाढ

ठरलं! स्टार प्रवाहवरील आणखी एक कार्यक्रम घेणार निरोप; त्याजागी दिसणार 'हा' शो; प्रोमो व्हायरल

Latest Maharashtra News Updates : पतीच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्याने पत्नीची टोकाची कृती; बीडमध्ये खळबळ

Solapur News: मोहोळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, 17 गावांच्या आरक्षणात बदल

Railway Jobs 2025: रेल्वे मध्ये १० वी उत्तीर्णांसाठी मोठी भरती सुरु; प्रशिक्षणादरम्यान मिळेल आकर्षक मासिक वेतन!

SCROLL FOR NEXT