corona1 
पुणे

कसा रोखणार कोरोना? स्वॅबचा रिपोर्ट मिळतोय पाच दिवसांनी... 

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात नवीन 22 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह तालुक्या तील रुग्णांची एकूण संख्या 210 झाली आहे. संसर्ग वाढत चालला असल्याने प्रशासनासह गावकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर अहवाल लवकर मिळावेत, अशी मागणी होत आहे. कारण, नुकताच मंचर येथील एका कुटुंबातील रुग्णांच्या स्वॅबचा नमुना घेतला. पाच दिवसानंतर सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला.  

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथे पाच, गावडेवाडी येथे दोन, पारगावतर्फे अवसरी बुद्रुक येथे दोन, पेठ येथे एक आणि मंचर, अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, म्हाळुंगे पडवळ येथे प्रत्येकी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. गावडेवाडी गावात प्रथमच कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. उपचार घेऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 101 आहे. चार जणांचा मृत्यू झाला, तर 105 रुग्णांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय भीमाशंकर हॉस्पिटल व अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. 

मंचर येथील पॉझिटिव रुग्णांची संख्या 59 झाली आहे. मंचर शहरात रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने व ग्रामपंचायतीने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्वॅबचे नमुने घेतल्यानंतर अहवाल लवकर मिळावेत, अशी मागणी रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे. मंचर येथे एका कुटुंबातील रुग्णांचा नमुना घेतला. पाच दिवसानंतर सदर व्यक्ती पॉझिटिव्ह आला. हा अहवाल नमुना घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी मिळाला असता, तर संबंधित कुटुंबाला वेळेत उपचार मिळाले असते, अशी भावना कुटुंबीयांच्या नातेवाईक यांनी व्यक्त केली.

तपासणी नमुन्यांचा अहवाल लवकर मिळावा, अशी मागणी अनेक गावच्या सरपंचांनी आंबेगावचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांच्याकडे केली आहे. पुण्यातील प्रयोगशाळेतील डॉक्टरांशी बोलून लवकरात लवकर घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त होतील, असा प्रशासनाचा प्रयत्न आहे, असे पठारे यांनी सांगितले. नागरिकांनी स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. दुकानदारांनी सोशल डिस्टनचा वापर करावा. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Odisha Tragedy : ओडिशात मोठी दुर्घटना ! रुग्णालयाला भीषण आग; ICU मधील १० रुग्णांचा गुदमरुन मृत्यू

Dubai Airport Drone Attack : दुबई विमानतळावर इराणचा ड्रोन हल्ला ! आकाशात धुराचे लोट, विमानसेवा विस्कळीत

Sambhajinagar Hostel Mess 'Mess': CIPET वसतिगृहात धक्कादायक प्रकार: विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या-मुंगळे; महिनाभरात दहा वेळा घटना

Sambhajinagar News: शहीद सैनिकांच्या मुलांसाठी आनंदाची बातमी: MGM विद्यापीठात 100% मोफत शिक्षणासाठी भारतीय सैन्यदलासोबत करार

Sambhajinagar LPG News: गॅस तुटवड्यावर ‘सकाळ’चा दणका: बुढीलेनमध्ये हॉटेलवर छापा, घरगुती तीन सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT