rain.jpg 
पुणे

महत्वाची बातमी : पुण्यात 'या' दिवशी होणार पाऊस

सकाळवृत्तसेवा

पुणे : माॅन्सूनबाबत हवामान खात्याने महत्वाची माहिती दिली आहे. गुरूवारी राज्यात मान्सूनचं आगमन होण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने सांगितला आहे. सध्या गेल्या दोन दिवसांपासून तळकोकणात आणि गोव्यात हलक्या सरी कोसळत आहेत. दक्षिणेच्या किनारपट्टी भागात माॅन्सून उद्याच दाखल होणार आहे. असंच वेगवान मार्गक्रमण राहिलं तर शुक्रवारपर्यंत माॅन्सूनचा पाऊस पुण्यात पोहचेल, अशी माहिती हवामान खात्याने  दिली आहे.

दरम्यान, पुढच्या एक दोन दिवसात पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होईल. संपूर्ण राज्य व्यापण्यासाठी मान्सूनच्या वाऱ्यांना आणखी दोन दिवस लागतील. सध्या अरबी समुद्राकडून येणाऱ्या मोसमी वाऱ्यांमुळे गोवा, तळकोकणात पावसाच्या हलक्या सरी कोसळत असल्या तरी साधारण 15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होईल, असंही कश्यपी यांनी म्हटलं आहे.

येत्या 48 तासांत नैऋत्य मौसमी मान्सूनचं महाराष्ट्रात दणक्यात आगमन होईल, असा अंदाज पुणे वेशशाळेनं वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पहिल्यात टप्प्यात जोरदार पाऊस पडेल, असंही पुणे वेधशाळेचे हवामान तज्ज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी सांगितलं. कोकणात 11 तारखेला पुण्यात 12 तारखेला तर मुंबईत 13 तारखेला मान्सूनचा जोरदार पाऊस पडेल, असा अंदाजही पुणे वेधशाळेवं वर्तवला आहे. मान्सूनच्या पहिल्या आठवड्यात प्रामुख्याने बंगालच्या उपसागरावरून येणारे मोसमी वारे विदर्भ मराठवाड्यात चांगला पाऊस पाडतील असंही हवामान खात्यानं म्हटले आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे मान्सूनची वाटचाल मंदावली होती. ती पुन्हा जोमाने सुरू झाली आहे. केरळमध्ये वेळेवर पोहोचलेला मान्सून अरबी समुद्रात निर्माण झालेल्या या चक्रीवादळामुळे कर्नाटकमध्येच अडला होता. आता मान्सूनच्या आगमनासाठी पूरक वातावरण निर्माण झालं आहे, असं हवामान तज्ज्ञ सांगतात. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं आहे.

माॅन्सूनची वाटचाल

-1 जून केरळमध्ये आगमन

-4 जून कर्नाटकात दाखल, पण चक्रीवादळाने पुढचा प्रवास थांबला

-येत्या 48 तासात राज्यात मान्सूनचं आगमन

-पुण्यात 12 तारखेपासून मान्सूनचा पाऊस

-मुंबईत 13 तारखेपासून मान्सूनचा पाऊस

-15 तारखेपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT