jaybhavaninagar 
पुणे

कोथरूडमधील घरांमध्ये घुसले पाणी, रस्त्यांवर राडारोडा

सकाळ वृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : पौड रस्त्यावरील जयभवानीनगर येथील चाळ क्रमांक 1 अ व 2 अ मध्ये काही घरात रात्री पावसाचे पाणी शिरले, तर काही घरात बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहामधून पाणी बाहेर येत होते. 

याबाबत येथील रहिवासी अमर कांबळे यांनी सांगितले की, वर्षापूर्वी येथे सिमेंटचा रस्ता झाला. त्यावेळी या रस्त्याला जोडून पावसाळी वाहिनीचे काम करायला हवे होते. ते न झाल्याने येथील घरांमध्ये गेल्या वर्षीपासून पाणी घुसत आहे. यासंदर्भात येथील रहीवाशांनी 1 ऑक्टोबर 2019 ला महापालिकेकडे तक्रार करुन पावसाळी वाहिनी बंद केल्याबद्दल महापालिकेचा अभियंता व ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आता तरी यातून मार्ग काढावा. अन्यथा दरवेळी लोकांना त्रास सहन करावा लागेल. 

लॉकडाउनचा फायदा घेत कोथरुडमध्ये ठिकठिकाणी मलवाहिनी, पावसाळी वाहिनी आदीसाठी खोदकामे सुरु आहेत. या कामांचा राडारोडा रस्त्यावर तसाच पडून असल्याने त्याचा झालेला चिखल सगळीकडे पसरला आहे. कामावर निघालेल्या दुचाकीस्वारांची या चिखलावरून घसरून तारांबळ उडाली. तीन दुचाकीस्वारांनी जवळच्या दवाखान्यात उपचार घेतले. दरम्यान, यातील काही कामे महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता, कामाविषयी कोणताही माहिती फलक न लावता सुरु आहेत. याबद्दल स्थानिक रहीवाशांनी आश्चर्य व्यक्त केले. 

कोथरुडमध्ये काल दुपारपासून पावसाने आपली हजेरी लावली. संध्याकाळी सात ते साडेआठच्या वेळात झालेल्या जोरदार पावसामुळे सुतारदरा येथील शिवकल्याणनगर भागात वीजेची तार तुटल्याने रात्री उशिरापर्यंत अंधारात रहावे लागले. सृष्टी सोसायटी, डीपी रोडसमोर मेट्रोच्यावतीने खोदकाम सुरू असल्याचे सांगत आहेत. या कामाचा राडारोडा हटवला नसल्याने सृष्टी सोसायटी परिसरात मोठा चिखल झाला आहे. येथील चिखलात घसरल्याने दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul dairy election politics : पुढच्या ३ महिन्यात गोकुळ दूध संघासाठी होणार मतदान, लवकरच वातावरण तापणार

प्राइम व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी नव्या वेबसिरीज आणि सिनेमे ; जाहीर केली अधिकृत यादी

Latest Marathi News Live Update : मंत्री नरहरी झिरवाळ व्हिडिओ प्रकरणाला नवे वळण

Small Savings Update: बँक FD पेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिस स्कीम्सवर मोठा अपडेट; आता किती व्याज मिळणार?

Chhatrapati Sambhajinagar: तलाठ्यांना चिरडण्याचा प्रयत्न; पंचनामा करताना प्रकार; सिल्लोडमध्ये वाळू माफियांची वाढली मुजोरी

SCROLL FOR NEXT