JEE Advanced Topper chirag Falor took Admission into MIT at USA  
पुणे

Breaking: 'जेईई' ऍडव्हान्समध्ये टॉप येणारा चिराग भारतात शिकणारच नाही !

सकाळवृत्तसेवा

पुणे : भारतातील सर्वोच्च शिक्षण संस्था असणाऱ्या भारतीय तंत्रज्ञान संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी (आयआयटी) मध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी धडपडत असतात. "जेईई' ऍडव्हान्समध्ये टॉप येण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात, अशाच पद्धतीने कष्ट करून पुण्याचा चिराग फलोर हा "जेईई ऍहव्हान्स'मध्ये देशात पहिला आला. पण तो भारतात शिकणारच नाही. चिरागने अमेरिकेतील मॅसेच्युसेट्‌स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजीमध्ये (एमआयटी) प्रवेश घेतला असून, तेथे त्याचे ऑनलाइन क्‍लास सुरू झालेले आहेत.

दिल्ली "आयआयटी'तर्फे 27 सप्टेंबर रोजी देशभरात "जेईई ऍडव्हान्स'ची परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी 1 लाख 60 हजार 838 जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1 लाख 50 हजार 838 जणांनी ही परीक्षा दिली होती. आज (सोमवारी) सकाळी जेईई ऍडव्हान्सचा निकाल ऑनलाइन जाहीर झाला. 43 हजार 204 विद्यार्थी "आयाआयटी' प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये 6 हजार 707 विद्यार्थ्यीनी आहेत. "आयआयटी'ने जाहीर केलेल्या रॅकिंगमध्ये चिराग फलोर हा याने 396 पैकी 352 गुण घेऊन देशात पहिला क्रमांक मिळवला आहे. तर कनिष्का मित्तल हिने 315 गुण घेऊन मुलींमध्ये पहिला क्रमांक पटकावला, तिचा देशात 17वा रॅंक आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कल्याणीनगर येथील सेंट अरनॉड सेंट्रल स्कुल या शाळेमध्ये चिरागचे शिक्षण झाले आहे. त्याने इयत्ता 9वी पासून "आयआयटी' प्रवेशासाठी तयारी सुरू केली होती. त्यानंतर तो 11वीला गेल्यानंतर दिल्ली येथे जाऊन आकाश इन्स्टिट्यूटमध्ये तयारी सुरू केली होती. दोन वर्ष तेथे तयारी केली. 13 सप्टेंबर रोजी जेईई मेन्सचा निकाल जाहीर झाला होता. त्यामध्ये चिरागने 300 पैकी 296 गुण घेऊन देशात 12वा रॅंक मिळवला होता. तर, दिल्ली एनसीटीमध्ये प्रथम आला आहे होता. त्यानंतर झालेल्या जेईई ऍडव्हानमध्ये त्याने थेट देशात पहिला क्रमांक पटकावाल आहे.

चिराग हा आयआयटी मुंबई विभागातून टॉपर आहे, त्याचा प्रवेश तेथे होणार हे स्पष्ट असताना आतो तो भारतात शिकणारच नसल्याचे समोर आले आहे. चिरागने अमेरिकेतील सुप्रसिद्ध अशा "एमआयटी' संस्थेत प्रवेश घेतला असून, त्याचे ऑनलाइन क्‍लास सुरू झालेले आहेत.

पुण्याच्या चिरागची पुन्हा बाजी! आता JEE Advance मध्ये देशात अव्वल

"सकाळ'शी बोलताना चिराग फलोर म्हणाला, ""इयत्ता 9वी, 10वीत असताना 11वी व 12 वीचा बेसिक अभ्यास पूर्ण केला. त्यानंतर 12वीत असताना फक्त मॉक टेस्टद्वारे प्रश्‍न सोडविण्याचा सराव केला. त्याचा फायदा मला झाल्याने हे यश मिळाले आहे. पण मी "आयआयटी' मध्ये प्रवेश घेणार नाही. "एमआयटी'मध्ये शिकण्याचे माझे लहानपणापासूचे स्वप्न होते. अकरावीचे वर्ष संपत आलेले असताना "एमआयटी'ची प्रवेश प्रक्रिया समजून घेऊन, त्यादृष्टीने अभ्यास सुरू केला. त्या परीक्षेचा निकाल 14 मार्चला जाहीर झाला, त्यानंतर माझा प्रवेश निश्‍चीत झाला. सध्या माझे ऑनलाइन क्‍लास सुरू असून, जानेवारी महिन्यात अमेरिकेला जाणार आहे.



देशातील टॉप टेन
रँक    नाव
1 चिराग फलोर
2 गांगुला रेड्डी,
3 वैभव राज
4 आर मुहेंदर राज
5 केशव अग्रवाल
6 हर्दिक राजपाल
7 वैदांग असगांवकर
8 समय चोबे
9 हर्षवर्धन अगरवाल
10 धवनीत बेनीगल


विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT