_JEE-Mains-Result.jpg
_JEE-Mains-Result.jpg 
पुणे

JEE Mains Result जाहीर; महाराष्ट्राच्या तिघांना 100 पर्सेंटाईल

सकाळवृत्तसेवा

पुणे :  नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यंदा नियोजित वेळेपूर्वीच निकाल जाहीर केला आहे. जेईई मेन्स परीक्षेचा निकाल आजच लावत 'एनटीए'ने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. या परीक्षेचे निकाल https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx या अधिकृत संकेतस्थळावर पाहता येतील. 

निकाल कसा पाहाल? 
https://jeemain.nic.in/webinfo/Public/Home.aspx या संकेतस्थळावर जाऊन ऍप्लिकेशन नंबर आणि जन्मतारीख टाकली, की निकाल पाहता येईल. 

या परीक्षेचा निकाल 31 जानेवारी रोजी जाहीर केला जाईल, असे यापूर्वी घोषित करण्यात आले होते. पण त्यापूर्वीच तब्बल 11 दिवस हा निकाल जाहीर झाला आहे. यंदापासून जेईईचे निकाल पर्सेंटाईलमध्ये दिले जाणार आहेत. त्यामुळे यंदा एकाहून अधिक 'टॉप स्कोअरर' विद्यार्थी असू शकतात. 

यंदाच्या परीक्षेत 15 विद्यार्थ्यांनी 100 पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यापैकी तीन विद्यार्थी महाराष्ट्रातील आहेत. 'एनटीए'ने प्रत्येक राज्यानुसारही गुणांकन यादी जाहीर केली आहे. एकूण 9,29,198 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. 

महाराष्ट्राच्या राज आर्यन अगरवाल, अंकितकुमार मिश्रा आणि कार्तिकेय गुप्ता या तिघांना 100 पर्सेंटाईल मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT