Jica 
पुणे

‘जायका’चा चेंडू पुन्हा सर्वसाधारण सभेमध्ये! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - अंदाज समिती आणि सर्वसाधारण सभेची मान्यता घ्या. तसेच, प्रकल्पाच्या सर्व जागा ताब्यात आल्याशिवाय निविदा काढू नका, अशा स्पष्ट सूचना केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्रालय आणि ‘जायका’ने महापालिकेला दिल्या आहेत. त्यामुळे या प्रकल्पासाठी पुन्हा प्रशासनाला सर्वसाधारण सभेपुढे जावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शहरातील शंभर टक्के सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ‘जायका’ आणि केंद्र सरकारच्या मदतीने महापालिकेने ९९० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे काम हाती घेतले आहे; परंतु महापालिका प्रशासनाच्या धरसोड वृत्तीमुळे अद्यापही हा प्रकल्प निविदेच्या प्रक्रियेतच अडकून पडला आहे. यापूर्वी जादा दराने निविदा आल्याची ओरड करीत महापालिकेने त्या रद्द केल्या. झालेली चूक कबूल करण्याऐवजी नव्याने ‘वन सिटी-वन ऑपरेट’ या तत्त्वावर निविदा काढण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती महापालिकेने केली. जलशक्ती मंत्रालय आणि ‘जायका’ने त्यास तत्त्वतः: मान्यता दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्याने निविदेसाठीच्या अटी-शर्ती तयार करून महापालिकेने त्या केंद्र आणि ‘जायका’ला पाठविल्या आहेत. त्यास अद्याप मान्यता मिळालेली नाही. तसेच, ११ प्रकल्पांपैकी केवळ सहा प्रकल्पांसाठीच्या जागा पूर्णपणे महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच निविदा काढण्याच्या सूचना पालिकेला देण्यात आल्याने  ३१ जानेवारीपर्यंत ही निविदा प्रक्रिया पूर्ण होणार का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

पालिकेचा कारभार कागदोपत्रीच
डिसेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत जलशक्ती मंत्रालय आणि ‘जायका’ने पुन्हा एकदा या प्रकल्पासाठी पूर्ण वेळ अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश असलेला स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करा, अशा सूचना महापालिकेला दिल्या आहेत. यावरून वारंवार सूचना देऊनही महापालिका कागदोपत्रीच कारभार करीत असल्याचे समोर आले आहे. कारण, महापालिकेकडून असा स्वतंत्र कक्ष कागदोपत्रीच स्थापन करण्यात आला असून, या कक्षात नेमलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे ‘जायका’ प्रकल्पाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : दिशा सालियनचे वडील वकिलांसोबत शनिवारी मातोश्रीवर जाणार; आदित्य ठाकरेंना स्वतः जाऊन अब्रुनुकसानीची देणार नोटीस

SCROLL FOR NEXT