नारायण पेठ (पुणे) - पुणे मराठी ग्रंथालयाच्या १०८ व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्यसम्राट न. चि. केळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. सुरेश पळसोदकर, पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. वीणा देव, रमण रणदिवे, जीवन इंगळे आणि सौ. इंगळे आदी
नारायण पेठ (पुणे) - पुणे मराठी ग्रंथालयाच्या १०८ व्या वर्धापनदिनानिमित्त साहित्यसम्राट न. चि. केळकर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. सुरेश पळसोदकर, पुरस्कारप्राप्त डॉ. प्रकाश खांडगे, डॉ. वीणा देव, रमण रणदिवे, जीवन इंगळे आणि सौ. इंगळे आदी 
पुणे

वाचन चळवळ उभी राहायला हवी - जीवन इंगळे

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्यात वाचनाची चळवळ उभी रहायला हवी. प्रत्येकाने याच क्षणापासून वाचन सुरू केले पाहिजे, अशी अपेक्षा सातारा जिल्ह्यातील खटाव येथील ज्येष्ठ ग्रंथालयीन कार्यकर्ते जीवन इंगळे यांनी व्यक्त केली.

पुणे मराठी ग्रंथालयाच्या शतकोत्तर आठव्या वर्धापन दिन कार्यक्रमाचे शनिवारी (ता. १२) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रकाश खांडगे, ज्येष्ठ साहित्यिका वीणा विजय देव, ज्येष्ठ कवी आणि गझलकार रमण रणदिवे यांना साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल; तर इंगळे यांना ग्रंथालयीन चळवळीतील योगदानाबद्दल ‘साहित्यसम्राट न. चिं. केळकर ग्रंथालय’ पुरस्काराने गौरविण्यात आले, त्या वेळी इंगळे बोलत होते.

प्रत्येकी रोख पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यंदा या पुरस्काराचे ४२वे वर्ष आहे. या वेळी डॉ. सुरेश पळसोदकर, डॉ. अनुजा कुलकर्णी, प्रा. चारुदत्त निमकर आदी उपस्थित होते.
इंगळे म्हणाले, ‘‘कितीही तंत्रज्ञान वाढले असले, तरीसुद्धा किमान ग्रामीण महाराष्ट्रात तरी आजही वाचनसंस्कृती जिवंत आहे. ती यापुढेही टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने आजपासूनच वाचन सुरू करण्याची गरज आहे.’’ डॉ. देव, खांडगे, रणदिवे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. पळसोदकर यांनी प्रास्ताविक केले. मनीषा आणि सई सुमंत यांनी स्वागतगीत आणि पसायदान सादर केले. निमकर यांनी सूत्रसंचालन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सायंकाळी पाच वाजेपर्यंत देशात 60.19 टक्के मतदान; महाराष्ट्रात 53.40 टक्के मतदानाची नोंद

Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Video: CSK ची प्रॅक्टिस पाहायला आलेला प्रेक्षक डॅरिल मिचेलच्या शॉटने जखमी, आयफोनही तुटला; त्यानंतर काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : आप आमदाराच्या मुलाची पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला मारहाण; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

SCROLL FOR NEXT