JNU student leader omar khalid participated in Maharally Against CAA at pune 
पुणे

पुण्यात CAA विरोधी मोर्चात आला 'जेएनयू'चा उमर खालीद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाविरुद्ध शहरात अल्पसंख्यांक समुदायाने दुसऱ्यांदा काढलेल्या मोर्चामध्ये रविवारी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयु) आंदोलनातील विद्यार्थी नेता उमर खालीद सहभागी झाला. खालीद विरुद्ध दिल्लीमध्ये देशद्रोहाचा गुन्हादाखल केल्याप्रकरणी, तर पुण्यातील एल्गार परिषदेमध्ये जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. 

केंद्र सरकारच्या नागरीकत्व दुरूस्ती विधेयकाविरुद्ध (सीएए) शहरामध्ये रविवारी दुसऱ्यांदा निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहर व जिल्ह्यातील हजारो अल्पसंख्यांक नागरीकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये माजी न्यायमुर्ती बी.जी.कोळसे पाटील, राहूल डंबाळे, मुन्नवर कुरेशी, इक्‍बाल अन्सारी, मौलाना झाहीद शेख यांच्यासह दिल्लीतील "जेएनयु' आंदोलनातील विद्यार्थी संघटनेचा नेता उमर खालीद गेला होता. निवेदन दिल्यानंतर विधानभवन येथे झालेल्या सभेच्या व्यासपीठावर दाखल होऊन भाषण केले. 

खालीद हा "जेएनयु' आंदोलनातील विद्यार्थी संघटनेचा नेता असून त्याच्यावर दिल्ली पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता. तर खालीदने दोन वर्षापुर्वी शनिवार वाड्यावर पार पडलेल्या एल्गार परिषदेमध्येही सहभाग घेतला होता. या परिषदेमध्ये खालीदने जातीय तेढ निर्माण करणारे भाषण केले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याप्रकरणी खालीदला ताब्यात घेण्याचा कोणताही विचार नसल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. 

JNU student leader Omar Khaled participated in Maharally Against CAA at puneJNU student leader omar khalid participated in Maharally Against CAA at pune

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Mumbai News: नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका, वेसावे ते भाईंदर कोस्टल रोडच्या कामाला वेग

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane Politics: मराठीचा मुद्दा चिघळला; मनसे महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

SCROLL FOR NEXT