Dry Fruits Sakal
पुणे

पोटातील बाळासाठी बाळंतविड्यातून माहेरपणाचा आनंद

बाळंतविडा किटच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला आठ किलो वजनाचा कोरडा पोषण आहार दिला जात आहे.

- गजेंद्र बडे

पुणे - ‘घरची आर्थिक परिस्थिती खराब. त्यातच वर्षभरापासून लॉकडाउन (Lockdown) सुरू असल्यामुळे पोटापाण्याचे वांदे... अशा परिस्थितीत पोटातील बाळासाठी (Baby) पोषण आहार (Nutrition Food) कसा विकत घेणार, यासाठी पैसे कुठून आणणार, याचीच चिंता (Anxiety) लागली होती. त्यामुळं बाळंतपणासाठी माहेर गाठलं. बाळंतीण (Delivery) होताच, आमच्या गावातील अंगणवाडीसेविकेने जिल्हा परिषदेच्या बाळंतविड्याची पिशवी (Balantvida Bag) घरी आणून दिली. यामुळे आम्हाला चांगला आधार मिळाला,’ अशी भावना इंदापूर तालुक्यातील नलवडेवस्ती येथील पूनम अतुल नलवडे (Poonam Nalawade) यांनी व्यक्त दिली. या पिशवीतील आहाराचे साहित्य पाहता माहेरपणाचा आनंद मिळाल्याची भावनाही त्यांनी या वेळी व्यक्त केली. (Joy of mastery from childbirth for a baby in the womb)

या बाळंतविडा किटच्या माध्यमातून प्रत्येक पात्र महिलेला आठ किलो वजनाचा कोरडा पोषण आहार दिला जात आहे. यामध्ये खारीक, खोबरं, डिंक, गूळ, काजू, आळीव, जवस, गावरान तूप, शेंगदाणे आणि फुटण्याच्या डाळ्या या १० वस्तूंचा समावेश आहे. या सर्व वस्तू एका बॅगमध्ये सीलबंद करून वाटप करण्यात येत आहेत.

जिल्ह्यातील कुपोषणाला आळा घालण्यासाठी पहिल्यांदा महिलांमधील कुपोषण कमी करणे आवश्‍यक आहे. यासाठी गर्भवती आणि बाळंतीण महिलांच्या आहाराची काळजी घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीने घेतला आहे. याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू केल्याचे या विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे यांनी सांगितले.

बाळंतविड्यातील साहित्य

  • खारीक- १ किलो

  • खोबरे- १ किलो

  • गूळ- २ किलो

  • शेंगदाणे- दीड किलो

  • फुटाण्याची डाळ- १ कि.

  • गाईचे तूप- अर्धा किलो

  • डिंक- पाव किलो

  • काजू- पाव किलो

  • आळीव- पाव किलो

  • जवस- पाव किलो

‘बाळंतविडा किट’ योजना

पुणे जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासवर्गीय कुटुंबातील बाळंतिणींसाठी ‘बाळंतविडा किट़’ वाटप ही अनोखी योजना सुरू केली आहे. अशा पद्धतीचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे. या योजनेंतर्गत बाळंतीण झालेल्या महिलांना अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून घरपोच हे किट दिले जात आहे. बालके आणि महिलांमधील कुपोषण कमी करणे, हा या योजनेचा हेतू आहे. गेल्या दोन महिन्यापासून आतापर्यंत जिल्ह्यातील सहा हजार महिलांना याचा लाभ देण्यात आला आहे.

महिलांना बाळंतपणात अतिरिक्त पोषण आहाराची गरज असते. ही गरज भागविण्यासाठी गरीब कुटुंबांची आर्थिक ताणाताण होत असते. हे टाळण्यासाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना बाळंतविड्याच्या माध्यमातून हा आहार दिला जात आहे. याचा मोठा आधार मिळाला आहे.

- पूजा पारगे, सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिल्हा परिषद

या योजनेमुळे गरीब कुटुंबांतील बाळंतिणींना पोषण आहार मिळू लागला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांनी या योजनेचे स्वागत केले आहे. ही योजना केवळ मर्यादित काळासाठी न ठेवता कायम चालू ठेवण्याची मागणी महिला करू लागल्या आहेत.

- उषाकिरण सावंत, अंगणवाडीसेविका, इंदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cricketer Retirement: दिग्गज अष्टपैलूची ३५ व्या वर्षी निवृत्तीची घोषणा, दोन वर्षांपूर्वी खेळलाय शेवटचा कसोटी सामना

पुण्यात भाजपने दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांना दिलं तिकीट, निष्ठावंत नाराज; बंडखोरीची शक्यता

एवढी गर्दी की, 'थलपती' विजय कोसळला, जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावला, viral video

CRPF Recruitment 2025: केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात नोकरीची सुवर्णसंधी! 25,487 जागांसाठी भरती सुरू, 31 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख

New Year 2026 : आपण कुठे चाललो आहोत?

SCROLL FOR NEXT