पुणे

तडजोडीसाठी इच्छुक असलेल्या अनेक पक्षकारांचे व्हिडिओ कॉलिंगद्वारे न्यायदान

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनामुळे गेले दहा महिने एकही लोकअदालत झाली नाही. त्यामुळे तडजोडीसाठी इच्छुक असलेल्या अनेक पक्षकारांचे दावे प्रलंबित आहेत. हे दावे आता पहिल्यांदाच व्हिडिओ कॉलिंगद्वारे निकाली काढण्यात येणार आहे. 
१२ डिसेंबर रोजी होणाऱ्या महालोकअदालतीमध्ये दावा निकाली काढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या व्हिडिओ कॉलिंगचा वापर करण्यास महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे घरबसल्या न्याय मिळणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अशी असेल प्रक्रिया 
लोकअदालतीमध्ये खटला ठेवलेल्या वादी किंवा प्रतिवादीने त्याला प्रत्यक्ष हजर राहता येणार नसल्याची माहिती त्याच्या वकिलाला द्यावी. प्रकरण जेव्हा तडजोडीसाठी पॅनेलसमोर जाईल तेव्हा पक्षकाराला त्याच्या वकिलाच्या मोबाईलवर व्हिडिओ कॉलिंगद्वारे हजर व्हावे लागेल. 

अशी होणार सुनावणी  
ऑनलाइन हजर झालेल्या पक्षकारांची तपासणी झाल्यानंतर पॅनेल त्याला तडजोडीच्या अटी समजावून सांगेल. त्याला जर तडजोड मान्य झाली, तर निकाल दिला जाईल. 

मार्चपासून केवळ तत्काळ प्रकरणांवर सुनावणी होत आहे. अशा परिस्थितीत लोकअदालतीमध्ये लवकर दावे निकाली लागतात. तसेच कोर्ट फी परत मिळते. विशेष म्हणजे पहिल्यांदाच लोकअदालतीमध्ये व्हिडिओ कॉलिंगचा वापर करता येणार आहे. 
- चेतन भागवत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : आवेश खानने हैदराबादला दिला मोठा धक्का; हेड अर्धशतकानंतर बाद आता रेड्डीवर मदार

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT