Juice bar for birds in Bhosalewadi near Untwadi 
पुणे

उंडवडी नजीक भोसलेवाडीत साकारतोय पक्ष्यांसाठी ज्युसबार

संतोष काळे

राहू : उंडवडी नजीक भोसलेवाडी (ता. दौंड) येथे 'एक मित्र एक वृक्ष' या संस्थेच्या वतीने पाचशे झाडे लावली असून त्यात झाडांचे हून अधिक प्रकारच्या झाडांचे वृक्षरोपण नुकतेच करण्यात आले आहे. हा स्तुत्य उपक्रम नव्याने हाती घेतला असून महाराष्ट्रात कदाचित पहिलाच उपक्रम राबवत आहे. अशी माहिती एक मित्र एक वृक्ष संस्थेचे प्रमुख डॉ. प्रशांत मुथा यांनी दिली.

भोसलेवाडी येथील ओढयाशेजारील जागा जेसीबी यंत्राच्या साह्याने साफसपाई करून घेतली. संस्थेचे स:यंमसेवक तसेच गावातील ग्रामस्थांनी आपापसातील किरोकळ मतभेद विसरून अशा स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन वृक्षारोपण करण्यास मदत केली. इतर गावातील ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करू दिल्यास त्या परिसरातपण आमच्या एक मित्र एक वृक्ष संस्थेच्या माध्यमातून वृक्षारोपण केले जाईल.

बायकोवर बलात्कार आणि 20 लाखाची खंडणी; काय आहे प्रकरण

झाडांच्या निघा राखण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन आमच्या संस्थेला सहकार्य करावे. असे आवाहन डॉ. मुथा यांनी केले. ''एक मित्र एक वृक्ष ही संस्था गेली सहावर्षांपासून अहोरात्र काम करत आहे. विविध संकल्पना राबवत आईचे झाड, देवांच झाड, वाढदिवसानिमित्त झाड असे दहा दहा ते बाराहजार वृक्षारोपण केले आहे. झाडांना पाणी देण्यासाठी टिबक सिंचनाचा वापर केला जातो. पक्ष्यांना आनंदीमय जीवन जगण्यासाठी झाडे लावली पाहिजे. पक्षांना अन्न खाण्यासाठी फुले, फळे मिळाली पाहिजे म्हणून पक्षांसाठी ज्युसबार हा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यामध्ये वड, पिंपळ, चिंच, कडूलिंब, उंबर, काटेसावर, काटेरी पांगारा, खैर, रिटा आदी प्रकारची झाडे लावली आहे. त्यामुळे पक्षांची संख्या वाढण्यास मदत होईल. पक्षांना अन्न मिळेल, घरटी मिळतील त्यामुळे पक्षसंवर्धन मोठया प्रमाणात मदत होईल.'' 
- प्रशांत मुथा - अध्यक्ष - एक मित्र एक वृक्ष संस्था.


''पक्षासांठी ज्युसबार हा उपक्रम स्तुत्य आहे. पक्षांच्या मुलभूत गरजा अन्न, वस्त्र, निवारा यातून नक्कीच पुर्ण होतील. या उप्रक्रमामुळे गावाच्या वैभवात नक्कीच भर पडेल. उपक्रमासाठी गावातील ग्रामस्थांनी एकदिलाने सहकार्य करत आहे. यापुढे सहकार्य असेच सुरू राहिल. ''
- वैशाली सचिन गुंड - माजी सरपंच उंडवडी (ता. दौंड) / दिनेश गडधे तंटामुक्ती अध्यक्ष उंडवडी (ता. दौंड)

विद्यार्थी-पालकांसाठी महत्त्वाची बातमी; परीक्षा फी वाढीला पुणे विद्यापीठाने लावला ब्रेक​

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर रात्री दीडलाच का केला हल्ला? CDS चौहानांचा 'ऑपरेशन सिंदूर'वर मोठा खुलासा; म्हणाले, 'पहिली अजान...'

MLA Bachchu Kadu: अन्यथा भाजपचा बॅलेट कोरा करणार: आमदार बच्चू कडू; शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाच काय झालं

Latest Marathi News Updates : मुंबई उच्च न्यायालयाला पुन्हा बॉम्बची धमकी; पोलिसांचा कडक तपास सुरु

Local Megablock: तीन दिवस विशेष ब्लॉक! लाेकल, मेल-एक्स्प्रेसवर परिणाम, वेळापत्रकात बदल; पाहा कधी आणि कोणत्या मार्गावर?

'अरे ही तर म्हातारी...' शाहरुखच्या होणाऱ्या सूनेला नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, आर्यनची गर्लफ्रेंड आहे तरी कोण?, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT