Kadaknath 
पुणे

कडकनाथ फसवणूक प्रकरण; महारयत ऍग्रोच्या संस्थापकास अटक

सकाळवृत्तसेवा

पुणे - कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून होणाऱ्या फायद्याचे आमिष दाखवून 5 कोटी 82 लाखांची फसवणूक करणाऱ्या महारयत ऍग्रो इंडीया प्रा. लि. च्या संस्थापक-अध्यक्षास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सुधीर शंकर मोहिते (रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणात यापूर्वी प्रीतेश रमेश माने याला अटक करण्यात आली आहे. नीलेश शिवाजी आंबेडे (वय 35, रा. धनलक्ष्मी सोसायटी) यांनी दत्तवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कंपनीचे संचालक हनुमंत जगदाळे, संदीप मोहिते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार एक फेब्रुवारी 2019 पासून सुरू होता.

शेतकऱ्यांना कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायातून होणाऱ्या फायद्याचे आमिष दाखवून महारयत ऍग्राइंडीया प्रा. लि.च्या माध्यमातून शेतकऱ्यांची पाच कोटी 82 लाख 26 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत 197 शेतकऱ्यांचे फसवणुकीबाबत अर्ज प्राप्त झाले आहे. मोहिते याच्या बॅंक खात्यांची माहिती घ्यायची आहे. 

मोहिते याने इतर पाच कंपन्या स्थापन केल्या आहेत. त्यासंदर्भात सखोल तपास करायचा असल्याने सरकारी वकील सुरेखा क्षीरसागर यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. ही मागणी मान्य करीत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. के. बाफना यांनी त्यास तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. राज्यासह कर्नाटक, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील देखील अनेकांची अशा प्रकारे फसवणूक झाली आहे. महारयत विरोधात आत्तापर्यंत 10 गुन्हे दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT