kadus village were worried due to a MLA infected with coronaVirus 
पुणे

कोरोना झाला आमदारांना; ग्रामस्थांचा जीव टांगणीला

महेंद्र शिंदे

कडूस : एका राजकीय पक्षाचे शहर पदाधिकारी व विद्यमान आमदार असलेल्या जिल्ह्यातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समजल्यानंतर कडूस (ता.खेड) येथील काही जणांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न होण्याच्या तीन दिवस अगोदर त्यांचा कडूसच्या काही ग्रामस्थांशी संपर्क आल्याची भीती व्यक्त होत आहे. आपल्या नवीन फार्महाऊसच्या भूमिपूजन कार्यक्रमानिमित्त ते कडूस येथे येऊन गेले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  

पिंपरी चिंचवड शहरातील या बड्या राजकीय प्रस्थाची गेल्या अनेक वर्षांपासून कडूसला ये-जा असते. त्यांनी परिसरात अनेक मित्र व कार्यकर्ते जोडले आहेत. शहरातून ते आले की त्यांच्या भेटीला नित्यनेमाने धाव घेणारे अनेक जण गावात आहेत. गेल्या चार महिन्यांपासून कडूस येथील कुमंडला नदीवरील बंधाऱ्यालगत त्यांचे जमीन सपाटीकरण व जमिनीच्या विकासाचे काम सुरू आहे. या ठिकाणी त्यांना नवीन फार्महाऊस बांधायचे आहे. शहरातून देखरेखीसाठी आलेल्या कार्यकर्त्यांची मोठी रेलचेल असते. मागील आठवड्यात या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमाला ते स्वतः कुटुंबासमवेत हजर होते. शहरातून काही कार्यकर्ते सुद्धा आले होते.
 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कडूस गावातील नेहमीचे काही जवळचे कार्यकर्ते देखील उपस्थित होते. या ठिकाणी छोटेखानी मंडप टाकला होता. कार्यक्रमानंतर तीनच दिवसांनी संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचे धाबे दणाणले.  ग्रामस्थांच्या मनात किंचितशी धाकधूक वाढली आहे. संपर्कात नक्की किती आले त्याचा आकडा समजणे कठीण आहे. संपर्कात आलेल्यांनी विशेष काळजी घेण्याचे मत ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. अगोदरच कडूसमध्ये सहा पॉझिटिव्ह सापडले आहेत. ते सर्व बरे होऊन घरी परतले आहेत. पण कोरोनाची धास्ती ग्रामस्थांच्या मनात कायम आहेच. त्यातच या घटनेमुळे आणखी भीती वाढली आहे. याबाबत एका कार्यकर्त्याने सांगितले, 'दादा आले होते. घरगुती कार्यक्रम होता. पण ते कोणाच्याही जवळ आले नाही किंवा कोणीही त्यांच्या जवळ गेले नाही. त्यांनी व उपस्थितांनी काळजी घेतली होती. लांबूनच हाय-बाय केले. कार्यक्रम झाला आणि ते लगेच निघून गेले.'

पुण्यात अर्ध्या तासात कोरोना चाचणी; महापालिकेकडे एक लाख किट उपलब्ध 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

Raj Thackeray: निळा मफलर.. डोळ्यांवर गॉगल! राज ठाकरेंच्या 'लूक'मध्ये राजकीय संदेश? अमित ठाकरेही निळ्या शर्टवर

SCROLL FOR NEXT