Eknath shinde  Esakal
पुणे

Kasba Election : कसब्यात राजकीय भूकंप होणार?; शिंदे-टिळकांमध्ये खलबतं

कसबा आणि चिंचवडच्या दोन जागांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Kasba Bypoll Election : कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आता अवघे दोन दिवस उरले आहेत. कसबा आणि चिंचवडच्या दोन जागांसाठी येत्या २६ फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार आहे.

कसब्यात मविआकडून रवींद्र धंगेकर तर, भाजपकडून हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कसब्यातून टिळक कुटुंबियांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र, भाजपकडून टिळक कुटुंबियांना डावलून रासनेंना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे ब्राह्मण समाजासह अनेकांमध्ये नाराजी सूर उमटला होता. त्यानंतर फडणवीसांसह भाजपच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी टिळक कुबियांची भेट घेतली होती.

त्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी निवडणुकीला ४८ तास उरलेले असतानाच टिळक कुटुंबियांची भेट घेतली आहे.

शिंदे यांनी केसरीवाडा येथे जाऊन मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक मुलगा कुणाल टिळक यांची भेट घेतली आहे.

दरम्यान, प्रचाराचे ४८ तास उरलेले असताना शिंदेंनी टिळक कुटुंबियांची भेट घेतल्याने ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती या चर्चाना उधाण आले आहे.

मतदानापूर्वी शिंदे आणि टिळक यांच्यात भेट झाल्याने कसब्यात काहीतरी मोठं घडणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला असून, या भेटीमुळे कसब्यात आता निकाल कुणाच्या बाजूने लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT