Keep-Fit
Keep-Fit 
पुणे

योगदिनी ‘कीप फिट’चे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने योगासने कशी करावीत, याची माहिती देणारे ‘कीप फिट’ हे पुस्तक ‘सकाळ’ प्रकाशनने नुकतेच प्रसिद्ध केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने येत्या २१ जून रोजी सकाळी सात वाजता बालेवाडी येथील क्रीडा संकुलात मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमात या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या योगतज्ज्ञ मनाली देव यांनी हे पुस्तक लिहिले आहे. ‘सकाळ’मधील ‘कीप फिट’ सदरातील निवडक लेखांचे हे संकलन आहे. 

रोजच्या जीवनातील ताणतणावांचा यशस्वी सामना करायचा असेल, तर शरीर आणि मन दोन्हीही फिट असणे गरजेचे आहे. त्यासाठी व्यायामाला पर्याय नाही. भारतीय आयुर्वेदाची आरोग्य देणगी ठरलेली योगासने शरीराला आणि मनाला व्यायाम घडवून मानसिक शांतता व स्वास्थ्य प्रदान करतात.

अनेक आजार व व्याधींवर योगासने अत्यंत परिणामकारक ठरतात, असे सिद्ध झाले आहे. बेसिक पद्धतीच्या योगासनांचा समावेश या पुस्तकात केला असून, सर्वसामान्यांना वाचून सहजपणे करता येतील अशा सोप्या भाषेत आणि सचित्र पद्धतीने योगासनांची माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाचा शासनमान्य कार्यक्रम, तसेच शालेय स्तरावरील योग परीक्षांसाठीचा अभ्यासक्रमही पुस्तकात समाविष्ट केल्याने शाळांसाठीही हे पुस्तक उपयुक्त ठरेल. शंभर रुपये किमतीचे हे पुस्तक कार्यक्रमस्थळी, सकाळ मुख्य कार्यालय, सर्व आवृत्ती कार्यालये आणि महाराष्ट्रातील प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे.

ऑनलाइन खरेदीसाठी www.sakalpublications.com, amazon.in, bookganga.com  या संकेतस्थळांवर लॉग इन करावे. अधिक माहितीसाठी सकाळ पुस्तक दालन, ५९५, बुधवार पेठ, पुणे येथे अथवा ८८८८८४९०५० या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT