पुणे

पुण्यात ऑक्‍सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा सुरळीत ठेवा : अजित पवार 

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता उपचार सुविधांची कमी पडणार नाहीत, याबाबत खबरदारी घेतली जात आहे. रुग्णालयांची स्वच्छता, रुग्णालयांना ऑक्‍सिजन आणि रेमडेसिव्हिर औषधांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नागरिकांनीही मास्कचा वापर, स्वच्छता आणि सुरक्षित अंतर राखून कोरोना संसर्ग रोखण्याबाबत दक्षता घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. 

कोविड व्यवस्थापनाबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली येथील विधानभवन सभागृहात लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. राज्य उत्पादनशुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे (व्हिसीव्दारे), महापौर मुरलीधर मोहोळ, महापौर उषा ढोरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार गिरीष बापट, डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे, अतुल बेनके, सिद्धार्थ शिराळे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, सरकार, प्रशासन आणि जनतेच्या सहकार्यातून कोरोना संकटावर मात करणे शक्‍य आहे. प्रशासनाने शहरी आणि ग्रामीण रुग्णालयांमध्ये अत्यावश्‍यक सुविधांची उपलब्धता कायम ठेवावी. गरजू रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेत मिळाव्यात, याबाबत दक्षता घ्यावी. प्रशासनाने लोकप्रतिनिधींच्या सूचना विचारात घेऊन कोरोना प्रतिबंध उपाययोजनांबाबत कार्यवाही करावी. "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेला गती देण्यासोबतच बाधित रुग्णांवर वेळेत उपचार मिळवून देण्यासाठी नियोजन करावे. 

डॉ. गोऱ्हे यांनी "माझे कुटुंब-माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. डॉ. सुभाष साळुंखे म्हणाले, 14 ते 25 ऑक्‍टोबर या कालावधीत "पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार' अभियान राबविण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे ग्रामीण क्षेत्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी कोरोना स्थितीबाबत उपाययोजनांची माहिती दिली. "माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम प्रभावीपणे राबवून घरोघरी सर्वेक्षणावर भर देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : तोंडावर हात ठेवून बोलला, रेफरीने करेक्ट 'कार्यक्रम' केला; Miguel Almiron सोबत विचित्र घडलं... Video Viral

Telegram Ban नंतर ॲक्सेससाठी लोकांनी शोधल्या नव्या ट्रिक्स; रॉकेटच्या वेगाने वाढले VPN डाऊनलोड, 'या' पद्धतीने सुरुय गैरवापर

Latest Marathi Live Updates: SIR कडे दुर्लक्ष करू नका- राज ठाकरे

Jalgaon: सोन्यात साडेचार, तर चांदीत १३ हजारांची घसरण; आयातीवरील शुल्क, युद्धबंद झाल्याचा परिणाम

FDA Action: तुकाराम मुंढे अ‍ॅक्शन मोडवर, राज्यभरात धडाका; बालरोगतज्ज्ञाच्या रुग्णालयावर एफडीएची कारवाई, औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT