jejuri  
पुणे

यळकोट यळकोट जयमल्हार...जेजुरीत पारंपरिक पद्धतीने रंगली खंडोबाची गणपूजा

तानाजी झगडे

जेजुरी (पुणे) : खंडोबाचे मूळ स्थान असलेल्या जेजुरीच्या श्री क्षेत्र कडेपठार मंदिरात आज पारंपारिक पद्धतीने गणपूजा करण्यात आली. शेजचा भंडारा गावात ग्रामस्थांना वाटण्यात आला. गणपूजेला दरवर्षी येणारे भाविक व कलावंत यांची मात्र निराशा झाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

श्री शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार धाऱण केल्यानंतर सर्व देवगणांनी भंडारा वाहून पुजा केली होती. त्यामुळे आषाढ शुद्ध प्रतिपदा या दिवशी खंडोबाची गणपूजा
 करण्याची पद्धत आहे. सध्या मंदिरात दर्शन व उत्सावासाठी बंदी असल्याने पारंपारिक पद्धतीने मानपान जपत पूजा, आरती व छबिना, असे कार्यक्रम 
ग्रामस्थांनी पार पाडले.
 

वाणी व रामोशी समाज बांधव, गुरव, कोळी, वीर, घडशी, वाघ्या, मुरुळी यांच्यामार्फत गणपूजेच्या प्रथा सांभाळल्या जातात. गणपूजेला काल रात्री साडेआठ वाजता प्रारंभ झाला. नीलेश बारभाई यांनी गाभा-याची सजावट केली. राजेंद्र मोरे, सागर मोरे, समीर मोरे, ज्ञानेश्वर मोरे
यांनी छबिना काढला. मुन्ना बारभाई यांनी आरती केली. रमेश सोनवणे,रवींद्र नवगिरे यांनी दिवटी धरली. असा पारंपारिक पद्धतीने फक्त मोजक्याच मानक-यांच्या उपस्थितीत हा उत्सव साजरा करण्यात आला. या वेळी विश्वस्त नितीन कदम, देवसंस्थानचे सचिव सदानंद बारभाई, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश माने उपस्थित होते. 
 

मानाची पूजा काल रात्री साडेआठनंतर झाली. त्यानंतर रात्री दहा वाजता छबिना काढण्यात आला. स्वयंभू लिंगाला भंडा-याची शेज चढविण्यात आली. 
छबिना बारा वाजता मंदिरात आला. त्यानंतर मंदिर बंद करण्यात आले. आज सकाळी पहाटे पाच वाजता मंदिर उघडण्यात आले. भंडारा गोळा करण्यात आला. 
गोळा केलेला भंडारा प्रसाद म्हणून जेजुरीत गावात चौकात ग्रामस्थांना वाटण्यात आला. त्यानंतर या उत्सवाची सांगता झाली.
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Probable Squad 2027 ODI World Cup : विराट कोहली, रोहित शर्मासह ६ खेळाडूंची जागा पक्की! २०२७च्या वन डे वर्ल्ड कपसाठी कशी असेल टीम इंडिया?

Parli Vaijnath: परळीच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाकडे साकडे; सुनेत्रा पवारांकडून सकारात्मक प्रतिसाद

Latest Marathi News Live Update : कात्रज डेअरीकडून गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयाची वाढ

Gautala Sanctuary: गौताळा अभयारण्यात निसर्गाचा मनमोहक जल्लोष! सीताखोरी धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Hadapsar Traffic: अवघ्या 500 मीटरसाठी 30 मिनिटे! महंमदवाडी–उंड्री रस्त्यावरील वाहतूक कोंडीने नागरिक हैराण

SCROLL FOR NEXT