. Koregaon-Bhima Shourya Din vijayasthambha Abhivadan program will be telecast live on doordarshan 
पुणे

कोरेगाव-भीमा शौर्यदिन : विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासंदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय

सकाळवृत्तसेवा

पुणे : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी यापूर्वी आषाढी, कार्तिकी वारी, चैत्री यात्रा, दसरा, दिवाळी असे सण-समारंभ साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव भीमा (पेरणे फाटा) येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमातही नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. 

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने राज्यमंत्री देसाई यांनी सोमवारी (ता. 28) कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हा पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक विवेक पाटील या वेळी उपस्थित होते. 

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

राज्यमंत्री देसाई म्हणाले, मार्च 2020 पासून आपण सर्वजण कोरोना विषाणूचा सामना करत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी, कार्तिकी वारी, चैत्री यात्रा, दसरा, दिवाळी यासारखे सर्व सण-समारंभ आपण गर्दी न करता साधेपणाने साजरे केले आहेत. विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमही प्रशासनाच्या नियमांचे पालन करुन साजरा करायला हवा. नागरिकांच्या सोयीसाठी अभिवादन कार्यक्रमाचे दूरदर्शनवरुन थेट प्रसारण करण्यात येणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अभिवादन कार्यक्रमासाठी गर्दी करु नये. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात यावा. अभिवादन कार्यक्रमाच्या अनुषंगाने आवश्‍यक माहिती नागरिकांपर्यंत पोचण्यासाठी त्यांच्याशी संवाद ठेवावा, अशा सूचना त्यांनी पोलिस प्रशासनाला दिल्या. 

जिल्हा पोलिस अधीक्षक देशमुख यांनी विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Officer Mobile Video : खासदारांच्या काजू-बदामनंतर आता अधिकाऱ्यांचा असंवेदनशील चेहरा; कृषिमंत्र्यांच्या दुष्काळ आढावा बैठकीत मोबाईलमध्ये दंग

Kannad Teacher Credit Society: आमसभेत आर्थिक अनियमिततेचे आरोप; चर्चा सुरू असतानाच राष्ट्रगीताने सभा गुंडाळल्याचा दावा

Martyr Wife Success Story: १८ वर्षांपूर्वी पती गमावला; आज त्याच वर्दीत देशसेवेची जबाबदारी, वीरपत्‍नी कल्पना पवारांचा संघर्षमय अन् प्रेरणादायी प्रवास..

Marathi News Live Updates : पैठणमधील हर्षी खुर्द येथे सव्वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले

India Pakistan Passports : अंबरनाथमध्ये एकाच व्यक्तीकडे भारत-पाकिस्तानचे पासपोर्ट; मुंबई ATS कडूनही चौकशी सुरू

SCROLL FOR NEXT