कोथरुड - हसरा, खेळकर असलेल्या 12 वर्षीय विश्वजीतचा निर्घृणपणे खून झाल्याचं समोर आलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून तो बेपत्ता होता. त्याचा खून झाल्याचे समजताच परिसरातील महिलांना आपले अश्र् आवरणे कठीण झाले. असे घडलेच कसे असा सवाल विचारत महिला शोक करत होत्या. विशुने कोणाचे काय बिघडवले होते तेव्हा त्याचा असा सुड उगवला असे बोलताना शोक अनावर होवून महिला रडत होत्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, केळेवाडी येथील नवजवान मित्र मंडळाजवळील एका खोलीत भाडेकरु म्हणून विनोद आदीनाथ वंजारी हे राहत होते. त्यांचा मुलगा विश्वजीत हा शुक्रवारपासून बेपत्ता झाला होता. त्यानंतर मुलगा हरवला असल्याची तक्रार वंजारी यांनी पोलिसात तक्रार देखील दाखल केली होती. खेळायला जातो म्हणून घराबाहेर गेलेला मुलगा कुठे गेला म्हणून सर्वच जण शोध घेत होते. रविवारी सकाळी अकराच्या सुमारास त्याचा मृतदेह महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या पौडरस्त्यावरील मोकळ्या जागेत आढळून आला.
प्रथमदर्शनी खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्या मृतदेहाशेजारी पडलेल्या दगडविटांच्या तुकड्यांनी त्याला मारण्यात आल्याचं दिसत होतं. डोक्याला मोठ्या प्रमाणात मार लागला होता. तसेच अंगावरही जखमा असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे केळेवाडीसह कोथरुडमध्येही संताप व्यक्त करण्यात येत होता. पौडरस्त्यावरील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या मैदानाच्या प्रवेशव्दारावर मोठी गर्दी जमली होती. विश्वजीत हरवला त्या दिवशी त्याचे वडील बाहेरगावी होते. तो हरवल्याचे समजताच ते पुण्यात आले.
पोलिस उपनिरिक्षक भैरवनाथ शेळके म्हणाले की, विश्वजीत घरातून खेळायला जातो म्हणून निघून गेला होता. तो परत आला नाही म्हणून आमच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याअनुषंगाने आम्ही परिसरातील सीसीटीव्ही तसेच एआरएआय टेकडी परिसर, ड्रेनेज इत्यादी पाहीले. अनेकांकडे चौकशी केल्या. आज आम्हाला त्याचा मृतदेह आढळून आला. पालकांनी व्यक्त केलेल्या संशयितांची चौकशी सुरु आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.