Pune Court Convicts Seven Bangladeshi Women for Illegal Stay

 
sakal
पुणे

Kothrud Fraud Case : ''१४ कोटी महिनाभरात परत करू'' ; कोथरूड संगणक अभियंता फसवणूक प्रकरणी आरोपींचे न्यायालयात हमीपत्र सादर!

Latest update on the Kothrud fraud case: आरोपींच्या ३९ बँक खात्यांची माहिती मागविली असता त्यापैकी १३ खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

Mayur Ratnaparkhe

Kothrud Fraud Case: Accused Submit Court Undertaking : दुर्धर विकाराने ग्रासलेल्या मुलींचे आजारपण दूर करण्याचे आमिष दाखवून कोथरूडमधील एका संगणक अभियंता आणि त्यांच्या पत्नीची १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणातील आरोपींनी जोडप्याकडून उकळलेले पैसे ३० दिवसांत परत करण्याची हमी (पुरशीस) न्यायालयात सादर केली आहे.

आरोपींनी या जोडप्याची एकूण १४ कोटी ३९ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या गुन्ह्यात वेदिका कुणाल पंढरपूरकर (वय ४१), कुणाल वैजनाथ पंढरपूरकर (वय ४२, दोघे रा. महात्मा सोसायटी, कोथरूड), दीपक जनार्दन खडके (वय ६५, रा. वाडीवरे, नाशिक) यांना अटक करण्यात आली आहे. तर वेदिकाची आई व भाऊ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी फिर्यादी दिपक पुंडलीकराव डोळस यांच्याकडून वेळोवेळी १४ कोटी ३९ लाख एवढी रक्कम स्वीकारली आहे. ती स्वीकारलेली रक्कम आरोपींना मान्य असून ती तिन्ही आरोपी फिर्यादीस देण्यास तयार आहेत. न्यायालयाने तात्पुरता जामीन दिल्यास व कारागृहातून सुटल्यानंतर ३० दिवसांच्या आत रक्कम फिर्यादी यांना देतील, असे आरोपींच्या वकिलांनी न्यायालयात सादर केलेल्या लेखी हमीत नमूद आहे.

आरोपींच्या ३९ बँक खात्यांची माहिती मागविली असता त्यापैकी १३ खात्यांची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यातून आरोपींच्या विविध खात्यांवर फिर्यादी यांनी रक्कम पाठविल्याचे पुरावे सापडले आहे. आरोपींनी १४ कोटी ३९ लाख रुपये विविध ठिकाणी फिरविले असून त्यातून त्यांनी काही मालमत्ता व वाहने घेतले आहेत. त्यांनी केलेले एक हजार १३९ व्यवहार संशयित आहेत. विशेष नोंदणी व महानिरीक्षक यांच्याकडून ६ ते ७ विविध नोंदणी व त्यांचे दस्त पोलिसांना मिळाले आहेत.

पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने वेदिका पंढरपूरकर, कुणाल पंढरपूरकर आणि दीपक खडके यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी सरकार पक्षाच्यावतीने सरकारी वकील मकरंद औरंगाबादकर यांनी बाजू मांडली तर मुळ फिर्यादी यांच्यावतीने ॲड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. आय. पेरमपल्ली यांनी आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आरोपींची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: मुंबईतील ट्रेनमधील शौचालयाची दुर्गंधी दूर होणार! रेल्वेचा क्रांतिकारी निर्णय; नवीन योजना काय?

Manisha Mhaiskar : मोठी बातमी! कडक शिस्तीच्या मनीषा म्हैसकर गृह विभागाच्या नव्या अपर मुख्य सचिव, तर मिलींद म्हैसकर यांच्याकडे बांधकाम विभाग

IND vs NZ 5th T20I: इशान किशन खेळणार, संजू सॅमसनचा पत्ता कट होणार? टीम इंडियाच्या बॅटींग कोचने दिले महत्त्वाचे अपडेट्स

EXCLUSIVE: प्रभूचा कंटेन्ट अश्लील असूनही त्याला 'बिग बॉस मराठी ६'मध्ये का घेतलं? क्रिएटिव्ह हेडने दिलेलं उत्तर एकदा वाचाच

Budget Expectations 2026: यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी कौशल्य आणि पायाभूत सुविधांकडे लक्ष

SCROLL FOR NEXT