yedgaon dam
yedgaon dam e sakal
पुणे

कुकडी प्रकल्पाच्या उन्हाळी आवर्तनाला स्थगिती

रवींद्र पाटे ः सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कुकडी प्रकल्पातुन उन्हाळी हंगामातील पिकांच्या  सिंचनासाठी कुकडी प्रकल्पातुन सुरू असलेली सर्व आवर्तने बंद करण्यात आली असून कुकडी डावा कालव्यातून ९ मे २०२१ पासून सुरू होणारे नियोजित आवर्तन पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे. अशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांनी दिली. सिंचन व बिगर सिंचनाच्या दृष्टीने कुकडी प्रकल्प जुन्नर, आंबेगाव, शिरूर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या सात तालुक्याना वरदान ठरला आहे. मात्र हा प्रकल्प आठमाही असल्याने उन्हाळी हंगामात सिंचनासाठी प्रकल्पातुन कालव्यात आवर्तन सोडण्याची तरतूद नाही.

उन्हाळी हंगामातील पिकांच्या  सिंचनासाठी कुकडी प्रकल्पातुन पिंपळगाव जोगे, डिंभे उजवा, घोड शाखा , मीना शाखा  कालव्यात  व आवश्यकतेनुसार डिंभे डावा, मीना पूरक कालव्यात व कुकडी, मीना, घोड नदीवरील कोल्हापूर बंधाऱ्यात  पाणी सोडण्याचा निर्णय जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ९ एप्रिल २०२१ रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्या नुसार कुकडी प्रकल्पातुन उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले होते. कुकडी डावा कालवा व डिंभे उजवा व डावा कालवा ही आवर्तने वगळता इतर कालव्यातील आवर्तने पूर्ण झाली होती. दरम्यान कालवा सल्लागार समितीने दिलेल्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका राजुरी (ता. जुन्नर) येथील प्रशांत अ. औटी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती.

कुकडी प्रकल्प हा आठमाही असल्याने उन्हाळी आवर्तने सोडणे अपेक्षित नाही. तसेच पिंपळगाव जोगे धरणातील अचल( मृत) साठ्यातून आवर्तन पूर्ण करण्यासाठी पाणी घेऊ नये आदी मुद्दे औटी यांनी याचिकेत उपस्थित केले होते. या याचिकेवर न्या. के.के.ताथेड, न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या खंडपीठाने कुकडी प्रकल्पातुन सुरू असलेली सर्व आवर्तने स्थगित करण्याचा आदेश ६ मे २०२१ रोजी दिला.त्या नुसार डिंभे धरणातून उजवा व डावा कालव्यात व पिंपळगाव जोगे धरणातून येडगाव धरणात सुरू असलेले अवर्तन शुक्रवार पासून बंद करण्यात आले आहे. तसेच येडगाव धरणातून कुकडी डावा कालव्यात ९ मे २०२१ पासून जुन्नर, पारनेर, कर्जत, करमाळा, श्रीगोंदा या तालुक्यांना सुरू होणारे २८ दिवसांचे नियोजित आवर्तन पुढील आदेशापर्यंत थांबवण्यात आले आहे. याची नोंद लाभधारक शेतकऱ्यांनी घ्यावी. अशी माहिती कार्यकारी अभियंता कडूसकर यांनी दिली.

#आज अखेर धरण निहाय शिल्लक उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के): येडगाव :०.८५० (४३.१५ टक्के),माणिकडोह : ०.८१० (७.९६ ), वडज: ०.३२०  (२७.३३ ), डिंभे :४.५३८ (३६.३२ ), पिंपळगाव जोगे: ०(०), मृतसाठा : ३.९७६ टीएमसी.

: प्रशांत कडूसकर( कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता):

Kukdi irrigation project water supply for summer crops stop order by Mumbai High Court

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT