Corona Test 
पुणे

आता बारामतीतच होणार कोरोनाची तपासणी; टेस्ट लॅबला केंद्र सरकारचा हिरवा कंदील

मिलिंद संगई

बारामती (पुणे) : कोरोनाच्या तपासणीच्या दृष्टीने बारामती आणि पंचक्रोशीतील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची तपासणी प्रयोगशाळा बारामतीत सुरू झाली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाच्या तपासणीची प्रयोगशाळा व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता.

पुण्याच्या प्रयोगशाळांवर असलेला कमालीचा ताण कमी करून तातडीने अहवाल प्राप्त करण्यासाठी पुण्यासह जिल्ह्यात एका ठिकाणी अशी प्रयोगशाळा उभारणे गरजेचे होते. त्यातून बारामतीच्या प्रयोगशाळेस केंद्र शासनानेही परवानगी दिली आहे. 

याबाबत बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे म्हणाले की, बारामतीत दोन प्रणालीद्वारे तपासणी केली जाणार आहे. "सीबीनॅट' या मशिनद्वारे शुक्रवारपासून या तपासणीस प्रारंभ झाला असून, येत्या सात दिवसात "आरटीपीसीआर' मशिनद्वारे तपासणी होणार आहे. त्यात घशातील द्रावाचा नमुने तपासले जाणार असून, दोन तासात त्याचा अहवाल लगेचच प्राप्त होणार आहे.

यात "सीबीनॅट' मशिनवर रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याची पुन्हा "आरटीपीसीआर' मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. या तपासणीसाठी इतके दिवस पुण्याला द्रावाचे नमुने पाठवावे लागत होते. आता बारामतीतच तपासणी होणार आहे. या मशिनसाठी राज्य सरकारने सव्वा कोटी रुपयांचे अनुदान देऊ केले आहे. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या प्रयोगशाळेसाठी विशेष मदत केली.

बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ही सुविधा सुरू झाल्याने केवळ बारामतीच नाही, तर आसपासच्या जिल्ह्यातील रुग्णांची तपासणी शक्‍य होणार आहे. त्यामुळे पुण्याच्या प्रयोगशाळांवरील ताणही कमी होणार आहे. बारामतीकरांसाठी ही मोठी सोय झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वकिलाचे न्यायमूर्ती झालो, आता निवृत्तीला आलो तरी रुग्णालय नाही; मेळघाटातल्या कुपोषणावरून हायकोर्टानं सरकारला फटकारलं

उन्हाचा चटका अन् वादळी पावसाचाही तडाखा बसणार, कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भाला हवामान विभागाचा इशारा

शरण आलेल्या माओवाद्यांची नसबंदी रिओपनिंग शस्त्रक्रिया, कौटुंबिक आयुष्य सुखकर होणार

युद्ध थांबणं कठीण! इराणच्या अटी ठरू शकतात अडथळा, होर्मुझ टोल ते लष्करी तळ; अमेरिकेसमोर काय अटी?

Surat Station Redevelopment: A Boost for Mumbai-Gujarat Connectivity : मुंबई-सुरत लोकल सेवा सुरू होणार? सुरत स्टेशनवर सुरू असलेल्या 'या' कामांमुळे चर्चेला उधाण.

SCROLL FOR NEXT