garade
garade 
पुणे

सासवडकरांची मोठी चिंता मिटली

दत्ता भोंगळे

गराडे (पुणे) : पुरंदर तालुक्यातील सासवडला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांपैकी महत्वाचा समजला जाणारा गराडे पाझर तलाव नुकत्याच झालेल्या दमदार पावसाने पूर्णपणे भरून वाहत आहे. त्यामुळे सासवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. 

गराडे पाझर तलाव भरला असून, सध्या कऱ्हा नदी पात्रात प्रवाह सुरु आहे. वीर धरण व घोरवडी पाझर तलावही भरले आहेत. त्यामुळे सासवड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे. तसेच, गराडे तलावावर अवलंबून असलेल्या हिवरे, कोडीत, सुपे खुर्द, बोपगाव, चांबळी, गराडे गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांनाही फायदा होणार आहे. त्यांचाही पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तर, हिवरे, चांबळी व कोडीत गावांचा शेतीच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.  

दौंडमध्ये म्हशीला झालं जुळं
       
सासवडला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्रोतांपैकी महत्वाचा समजला जाणारा गराडे पाझर तलावाच्या पाण्याचे पूजन आमदार संजय जगताप यांच्या करण्यात आले. या वेळी सासवडचे नगराध्यक्ष मार्तंड भोंडे, मुख्याधिकारी विनोद जळक, विजय वढणे, संतोष गिरमे, अजित जगताप, पुष्पा जगताप, मनोहर जगताप, रामानंद कळसकर, पुरंदर उपसा सिंचन योजनेचे सासवडचे शाखा अभियंता शिवाजीराव बेद्रे, शाखा आभियंता निरज नागारसे, विश्वास पवार, आविनाश जगताप, धनंजय राऊत, जयंत चव्हाण, रमेश कोरपडे आदी उपस्थित होते.     

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT