Pune Lalit Patil
Pune Lalit Patil  
पुणे

Lalit Patil Drugs Case: ड्रग्ज माफिया ललित पाटीलच्या भावाला वाराणसीतून अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याच्या मुसक्या पुणे पोलिसांनी आवळल्या आहेत. याला उत्तर प्रदेशातील वाराणसी इथून पोलिसांनी अटक केली आहे. यामुळं आता ललित पाटीलही लवकरच पोलिसांच्या हाती लागू शकतो. (Lalit Patil Drugs Case Brother Bhushan Patil arrested from Varanasi action by Pune Police)

नाशिकमध्ये ड्रग्जचा कारखाना

ललित पाटील आणि भूषण पाटील हे दोघे भाऊ ड्रग्जच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. भूषणचा नाशिक इथं ड्रग्ज बनवण्याचा कारखाना आहे. या कारखान्यावर मुंबई आणि नाशिक पोलिसांकडून छापेमारी करम्यात आली. यामध्ये तब्बल ६०० कोटी रुपयांच्या ड्रग्जचा साठा आढळून आला होता. पुण्याच्या ससून रुग्णालयाच्या परिसरात ड्रग्ज सापडल्यानं खळबळ उडाली होती. यामध्ये या दोघा भावांचा हात होता. (Latest Marathi News)

आमदार फरांदेंचा संताप

दरम्यान, नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी या ड्रग्ज प्रकरणावर प्रतिक्रिया देताना नाशिकचा उडता पंजाब झाला असल्याचं म्हटलं आहे. नाशिकमध्ये इयत्ता ९वी आणि १० वीतली मुलं ड्रग्ज घेत असल्याचं लक्षात आलं आहे. कुठल्या शाळेच्या भोवती हे सर्व सुरु आहे, हे मी नाशिक पोलिसांच्या कानावर ६ महिन्यांपूर्वीच घातलं होतं. ड्रग्ज हँडर्लसचे काही फोन क्रमांकही मी पोलिसांना दिले होते. नाशिकरोड भागात हे ड्रग्ज तयार केले जात असल्याचा विषयही मी यापूर्वी मांडला होता, पण याला गांभीर्यानं घेतलं नाही आणि पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोपही फरांदे यांनी केला आहे. (Marathi Tajya Batmya)

ससूनमध्ये ९ महिने घेतले उपचार

ससून रुग्णालयात मागील 9 महिने उपचार घेत असलेला आरोपी ललित पाटील याने मोठ्या प्रमाणत अंमली पदार्थ विकण्याचा प्रकार पुणे पोलिसांनी उघडकीस आणला होता. या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्यानंतर ललित पाटील याने काही दिवसांपूर्वी पोलिसांना चकवा देत ससून रुग्णालयातून धूम ठोकली होती. या प्रकरणी राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. पोलिस प्रशासनाने संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, तर ससून रुग्णालयात विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी भेट देऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

ललितच्या फरार होण्यामागं शिंदे गटाचा हात - धंगेकर

पुण्यात 4 लाखांहून अधिक रुग्ण आहेत, त्यांच्यासह बाहेरील रुग्ण ससूनमध्ये उपचार घेण्यासाठी येतात. सरकार कोट्यवधी रुपये इथे खर्च करतं, त्यामुळं इथं चांगले उपचार मिळणं अपेक्षित आहे. मात्र, गुन्हेगारांना व्हीआयपी उपचार मिळतात, सर्वसामान्य रुग्णांना त्रास दिला जातो, हे सगळ्यांना माहिती होतं.

ललित पाटील सारखा गुन्हेगार 9 महिने इथे उपचार घेतो. इतर आजार असणाऱ्या रुग्णांना तात्काळ सोडले जातं, मग पाटीलवर नेमके कुठले उपचार केले? याचं उत्तर त्यांच्याकडं नाही. म्हणूनच दोषी डॉक्टरवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

तसेच हा सर्व प्रकार गंभीर असून त्याविरुद्ध अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचंही धंगेकर यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर ललित पाटील फरार होण्यामध्ये शिंदे गटाच्या आमदाराचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT