ANIMALS sakal
पुणे

'लंपी' आजाराने शेतकरी-दुग्धव्यावसायिक चिंतेत

वेगाने होतोय प्रसार ; उपचारांवर खर्च होताहेत नऊ ते दहा हजार

निलेश बोरुडे

किरकटवाडी : कधी अतिवृष्टी, कधी नापिकी तर मागील वर्षापासून कोरोना संकटामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी व दुग्धव्यावसायिक आता जनावरांना वेगाने संसर्ग वाढत चाललेल्या 'लंपी' या विषाणुजन्य आजारामुळे चिंतेत आहे. या आजाराची लागण झाल्यानंतर प्रति जनावरावर तब्बल नऊ ते दहा हजार रुपये उपचार खर्च करावा लागत असल्याने शेतकरी आर्थिक संकटातही सापडला आहे. सद्यस्थितीत शहराला लागून असलेल्या गावांमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

पुणे शहराच्या पश्चिम भागातील नांदेड, नऱ्हे, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला तसेच शहराला लागून असलेल्या इतर गावांमधील जनावरांना 'लंपी' आजाराची लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे.तसेच शेतकऱ्यांच्या माहीतीनुसार पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात हा आजार पसरत आहे. गाय, बैल या जनावरांना लंपी आजाराची लागण होण्याचे प्रमाण जास्त असून म्हशींनाही संसर्ग होत आहे. लागण झाल्यानंतर पंधरा दिवस उपचार करावे लागत असल्याने नऊ ते दहा हजार रुपये खर्च यासाठी शेतकऱ्यांना करावा लागत आहे. तसेच खाजगी पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून जनावरांना लंपी प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठीही प्रत्येकी 800 ते 1000 हजार रुपये शेतकरी व दुग्धव्यावसायिकांना खर्च करावे लागत आहेत.

लंपी आजाराची लक्षणे

लंपी हा जनावरांना होणारा विषाणुजन्य त्वचारोग आहे. यामध्ये जनावरांच्या शरीरावर काळे फोड येऊन जखमा होतात. गाय, बैल व म्हैस वगळता इतर जणावरांमध्ये(शेळी,मेंढी) हा आजार आढळून आलेला नाही. आजार झाल्यानंतर जनावरांना ताप येणे, डोळे व नाकातून स्राव गळणे, अंगावर गाठी येणे,लाळ गळणे, पायांना सूज येणे, चारा न खाणे, दुभत्या जनावरांच्या दुधात घट होणे अशी लक्षणे दिसून येतात.

असा होतो लंपीचा प्रसार

बाधित जनावरे निरोगी जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्याने,माशा,डास, गोचीड यांच्यामुळे, बाधित जनावरांच्या संपर्कातील वस्तू, बांधण्याचे ठिकाणी निरोगी जणावरांचा वावर यांमुळे हा आजार पसरतो.

प्रतिबंध कसा करावा

निरोगी जणावरांचे लसिकरण करुन घेणे,लागण झालेल्या जनावरांना निरोगी जनावरांपासून दूर ठेवणे, बाह्यपरोपजीवी नियंत्रणासाठी 1 लीटर पाणी,10 मिली करंज तेल, 10 ग्रॅम अंगाचा साबण हे मिश्रण जणावरांच्या अंगावर व गोठ्यात तीन दिवसांच्या अंतराने तीन वेळा फवारावे.आजाराची लागण झाल्यानंतर पशुवैद्यकीय तज्ज्ञांकडून योग्य औषधोपचार करुन घ्यावेत.

"खाजगी डॉक्टरांकडून जनावरांना लस घेण्यासाठी आठशे ते हजार रुपये लागतात.आजाराची लागण झाल्यानंतरही उपचारांसाठी मोठा खर्च करावा लागतोय. सरकारी लस व उपचार मिळाल्यास शेतकऱ्यांचा खर्च वाचेल."

- प्रविण दसवडकर, बैल मालक, खडकवासला.

"खानापूर व परिसरात किरकोळ प्रमाणात या आजाराची लागण झाली आहे. सरकारी दवाखाण्याकडून जनावरांचे लसिकरण करण्यात आले आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आम्हीही योग्य प्रकारे जनावरांची काळजी घेत आहोत."

- निलेश जावळकर, दुग्धव्यावसायिक, खानापूर.

"सुमारे 80 हजार जणावरांचे लसिकरण सद्यस्थितीत पूर्ण झाले आहे. लंपीचा संसर्ग वाढत असल्याने तातडीने वाढीव लसींची मागणी केली आहे. समाज माध्यमांतून या आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींनाही माहीती देण्यात आली आहे. आजाराची लागण झालेल्या जनावरांवर उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांनी परिसरातील सरकारी पशुवैद्यकीय दवाखाण्याशी संपर्क साधावा."

- डॉ. शितलकुमार मुकणे, पशुसंवर्धन उपआयुक्त, पुणे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora controversial exit : ३ लाख रुपये घेतले अन् १२ व्या मिनिटाला स्टेजवरून पळाली; अंजली अरोराच्या 'त्या' नखऱ्यांमुळे आयोजकांचा मोठा दणका!

IMD weather forecast 24 October : २४ ऑक्टोबरला देशातील हवामानात मोठा उलटफेर; गुलाबी थंडी वाढणार की पावसाची एन्ट्री? पाहा हवामानाचा नवा अंदाज!

शिवरायांच्या स्वराज्याची शान! महाराष्ट्रातील ‘या’ 5 किल्ल्यांना एकदा तरी भेट द्याच

Marathi News Updates : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Global internet security threat : इंटरनेट विश्वात मोठा भूकंप! गुगल, ॲमेझॉनसह OpenAI हाय अलर्टवर; जगभरातील अनेक वेबसाइट्स अचानक का बंद झाल्या?

SCROLL FOR NEXT