building.jpg 
पुणे

भाड्याने घर घेत का कुणी घर?; नवे भाडेकरू मिळत नाही अन्...

संदीप जगदाळे

हडपसर (पुणे) : पुणे शहरात भाड्याच्या घरात राहणाऱ्या लोकांचं प्रमाण अधिक आहे. मात्र, कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक परिस्थितीत त्यांना घराचे भाडे भरणे शक्य नसून त्यामुळे त्यांचे भाडे थकत असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर घरमालकांनी भाडेक-यांकडून भाडे वसूल करू नये आणि भाडे न दिल्यामुळे भाडेकरुंना घराबाहेर काढू नये, अशा सूचना राज्य सरकारने केल्या आहेत. त्यामुळे अनेक भाडेकरूंनी घराचे भाडे मालकाला दिलेले नाही. त्यामुळे घर मालकाना कर्जाचे हाप्ते कसे भरायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. तर ज्यांची उपजीविका भाडयावर आहे, अशा घर मालकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मार्च महिन्यापासून टाळेबंदी सुरू असल्याने सर्वच आर्थिक व्यवहार थंडावले आहेत. त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या रोजगारावरही झाला आहे. त्यामुळे लोकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे. कारखाने, बाजारपेठा आणि व्यावसायिक अस्थापने बंद झाल्याने अनेकांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे, अनेक भाडेकरूंकडून भाडे कमी करा अन्यथा आम्ही घर सोडतो असे घर मालकांना सांगण्यात येत आहे. सध्याच्या काळात घरे भाडयाने जात नसल्याने भाडे कमी करण्याशिवाय घरमालकांना पर्याय नसल्याचे दिसून येते. ब्रोकर व्यावसायिकांवर देखील बेरोजगारीची कु-हाड पडली आहे. याबाबत घरमालक संतोष राउत म्हणाले, खासगी क्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी यांना नोकरीची खात्री वाटत नाही, या परिस्थितीत कमी भाडे असलेले घरच चांगले असा विचार होत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. पूर्वीपेक्षा जास्त भाडे मिळेल ही अपेक्षा बाळगणे चूकीचे आहे. ही अपेक्षा ठेवली तर कोणीच भाडेकरू येणार नाही हे जाणून अनेक घर मालकांनी भाडयात सूट देण्यास सुरवात केली आहे.


घर मालक रवि केळकर म्हणाले, लॅाकडाऊन सुरू झाल्यापासून घरे अथवा दुकान गाळे भाडयाने देण्याचे व्यव्हार थंडावले आहेत. दरवर्षी शाळा सुरू होण्याच्या आधी मेमध्ये फ्लॅट भाडयाने देण्याच्या व्यवहारात वाढ होते. जे बदलीवर जाणार आहेत. ते फ्लॅट रिकामा करतात. मात्र, कोविडमुळे अनेक भाडेकरूंनी भाडेकरार संपूनही त्यांनी फ्लॅट सोडलेला नाही. त्यामुळे घरमालक व भाडेकरू यांच्यापुढे अडचणी निर्माण झाल्या आहेत. ब्रोकर राजाराम कुदळे म्हणाले, प्राईम लोकेशनला कोरोना संसर्गामुळे लोक खोल्या भाडयाने द्यायला तयार नाहीत, आणि ज्यांचा करार संपला आहे, ते फ्लॅट सोडायला तयार नाहीत. एखादया सोसायटीत भाडयाने कोणी राहण्यासाठी येणार असेल तर त्याची तातडीने चौकशी सुरू होते. संबधिताकडे वैद्यकीय प्रमाणपत्र आहे का ? लोक कुठून आलेत ? कोणाच्या सांगण्यावरून येथे आला ? असा चौकशीचा ससेमिरा मागे लागतो. त्यामुळे भाडयाने घर घेणा-यांसमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT