corona
corona 
पुणे

हवेलीकरांनो, आतातरी जागे व्हा...कोरोना रुग्णांचे आकडे धक्कादायक 

जनार्दन दांडगे

लोणी काळभोर (पुणे) : हवेली तालुक्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३४ नवीन रुग्ण आढळुन आले. त्यामुळे तालुक्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९० वर पोचली आहे. 

हवेली तालुक्यात आज आढळुन आलेल्या ३४ कोरोना रुग्णांपैकी मांजरी बुद्रुक (दहा), देहू (नऊ), लोणी काळभोर (चार), कदमवाकवस्ती (दोन), या चार बड्या ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 25 रुग्ण आढळुन आले आहेत. तर, उर्वरीत नऊ रुग्ण हे थेऊर (एक), खडकवासला (तीन), आगळंबे (एक), नांदेड (एक), कुंजीरवाडी (एक), उरुळी कांचन (दोन), अशा सहा ग्रामपंचायतीत आढळून आले आहे. मंगळवारी दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती हवेलीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

पूर्व हवेलीमधील लोणी काळभोर, मांजरी बुद्रुक, उरुळी कांचन व कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत मागिल तीन दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढीचा वेग मंदावला होता. मात्र, कालपासून वरील चारही ग्रामपंचायत हद्दीत कोरोना रुग्णांचा वेग वाढला आहे. मागिल दोन दिवसात उरुळी कांचन (सहा), मांजरी बुद्रुक (अकरा), लोणी काळभोर (पाच), कदमवाकवस्ती (दोन) या चार ग्रामपंचायत हद्दीत तब्बल 24 रुग्ण आढळून आले आहेत. विशेष बाब म्हणजे त्यात महिलांचे प्रमाण वाढू लागले आहे. 

डॉ. सचिन खरात यांनी सांगितले की, हवेली तालुक्यात आजपर्यंत कोरोनाचे ५८९ रुग्ण आढळुन आलेले आहेत. आज सायंकाळपर्यंत २८८ रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहे. तर, 290 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा वेग अकरा दिवसांवर पोचला असून, मंगळवारी दिवसभरात देहू (एक), गुजर-निंबाळकरवाडी (एक) व नऱ्हे (एक) या ग्रामपंचायत हद्दीतील तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

बिनकामाच्या गर्दीमुळे कोरोनाला आमंत्रण 
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या दोन्ही ग्रामपंचायती प्रशासकीयदृष्ट्या वेगवेगळ्या असल्या, तरी गाव मात्र लोणी काळभोरच सांगितले जाते. मागिल दहा दिवसांपासून या दोन्ही गावात कोरोनाचे रुग्ण अपेक्षेपेक्षाही वेगाने वाढत आहेत. लोणी काळभोर हद्दीत दहाहून अधिक, तर कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत दहाहून अधिक नागरिक कोरोना अॅक्टीव्ह आहेत. मात्र, दोन्ही गावातील नागरिक विनामास्क घराबाहेर पडत आहेत. दोन्ही गावातील पाच प्रमुख चौकात होणारी बिनकामाची गर्दी कोरोना आमंत्रण देत असल्याचे दिसत आहे. कोणीही याबाबत काळजी घेत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोणीकरांनो आतातरी जागे व्हा व कोरोनाला रोखण्यासाठी काळजी घ्या, असे म्हणण्याची वेळ प्रशासनावर आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT