corona
corona 
पुणे

पुरंदरमध्ये कोरोना सुसाट...तालुका शतकाच्या उंबरठ्यावर

श्रीकृष्ण नेवसे

सासवड (पुणे) : पुरंदर तालुक्यात आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अकराने वाढली. त्यात एकट्या सासवड शहरातील आठ रुग्ण आहेत. तर, तालुक्यातील तीन जण आहेत. तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 98 झाली आहे. 

आज सासवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या 61 वरून एकदम 69 वर पोचली. नित्यपणे रुग्ण आढळून येण्याचे सत्र थांबत नसल्याने सासवडकर धोकादायक परिस्थितीत चिंताग्रस्त झाले आहेत. तालुक्यातील कुंभारवळण, सोनोरी व धनकवडी येथेही प्रत्येकी एक-  एक रुग्ण सापडले. त्यामुळे शहर व तालुक्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 98 वर पोचला आहे. त्यातील 70 टक्के रुग्ण एका सासवड शहरातील आहेत. भोरमध्ये दोन रुग्णांची दखल घेऊन लाॅकडाउन केला जातो. पण, सासवड शहरात पाऊणशतक पार करूनही प्रशासनामार्फत ठोस उपाययोजना वा निर्णय का होत नाहीत, असा सवाल नागरिक करत आहेत.

सासवड शहर व परिसराचा कोरोना वाढीचा वेग असाच राहिला तर खुपच अवघड आहे. शहरातील निम्म्याहून अधिक लोक शिस्त पाळत नाहीत. बाजारपेठेत गर्दी होते आहे. त्यामुळे सासवड शहरावर निश्चित कोणाचे तरी नियंत्रण हवे व वेगळा पॅटर्न न राबविल्यास अजून खूप अवघड होईल, असे चित्र व संसर्ग  व्यापतीचा अंदाज आहे. शहरातील कोरोनाची स्थिती बिकट झाल्याने आता कुठे प्रशासन गांभीर्यपूर्वक चर्चा करु लागले आहे. 

सासवडसह पुरंदर तालुक्यात गेली बारा दिवसात संसर्गाचा वेग जिल्ह्यात जरा जास्तच आहे. पाच दिवसांपूर्वी सकाळी रुग्ण संख्येत सासवड 31 वर होते. आज 69 वर पोचून अल्पावधीत 38 रुग्ण वाढलेत. तालुका या दिवसात 50 वरुन 98 वर गेला. आजच्या पाॅझीटिव्ह 11 पैकी 8 रुग्ण सासवडचे व तीन नजिकच्या गावातील रुग्ण आहेत. सासवडमधील आठपैकी पाच नवीन रुग्ण व तीन जुन्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत. ग्रामीणमधील दोन जुन्या रुग्ण संपर्कातील व एक नवीन आहे.

सासवड व परिसरात कोरोना रोखण्यासाठी वेगळी उपाययोजना करणे गरजेचे आहे. कोरोनाबाधित पुण्याला सासवड अगदी जवळ आहे. त्यामुळे संसर्गाचा वेग अजून वाढण्याचा धोका आहे. पुणे कनेक्शनमधून सासवड व परिसरातील संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पुणे व बाहेर ये  - जा करणारे काम उरकून आल्यावर 'होम क्वारंटाइन' न राहिल्यास सासवड शहरातील परिस्थितीत फरक पडू शकत नाही, असे जाणकारांकडून स्पष्ट झाले. काही जाणकारांकडून साखळी तोडण्यासाठी पूर्ण  लाॅकडाउन दहा ते पंधरा दिवसांसाठी सुचविला गेला. अर्थात प्रशासन याबाबत अपेक्षित हालचाल करेल का, हे लवकरच समजेल.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT