For the last 28 years Russian woman in a jejury has been celebrating Ganpati festival
For the last 28 years Russian woman in a jejury has been celebrating Ganpati festival 
पुणे

२८ वर्षांपासून जेजुरीत रशियन महिला करतेय गणपतीची प्रतिष्ठापणा; व्हिडिओ पाहाच!

सागर आव्हाड

पुणे  : राज्यात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. यंदा कोरोनामुळे साधेपणाने आणि पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे सर्वांचा कल दिसत आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात जेजुरी येथे एक रशियन महिला गेल्या २८ वर्षांपासून आपल्या घरामध्ये पर्यावरण पूर्वक गणपती बसवून गणेशोत्सव साजरा करत आहेत. हिंदू आणि ख्रिश्चन धर्मियांच्या एकतेचे हे एक प्रतीक आहे. भाद्रपद शुध्द चतुर्थीला सर्वत्र गणेश मूर्तीची स्थापना होते. अनेक ठिकाणच्या उत्सव आणि परंपरा या लक्षवेधी ठरतात.

पुण्यातील 'जम्बो हॉस्पिटल'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार 'श्रीगणेशा'!​

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जेजुरी येथे या कुटुंबात एक वेगळा गणेशोत्सव साजरा होतो रशियातील असलेल्या मरिअण्णा या महिलेने ख्रिश्चन धर्मातून ख्रिश्चन धर्मातून हिंदू धर्मातील डॉ. विवेक आबनावे यांच्याशी विवाह करून सामाजिक एकतेचा संदेश दिला. विवाहनंतर दोन्ही कुटूंबानी आपआपल्या धार्मिक परंपरा जपण्याचे काम अखंडित सुरू आहे.

राज्यातील गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनेक प्रथा आणि परंपरा या पाहायला मिळतात असाच एक सामाजिक संदेश जेजुरीतील या आबनावे कुटुंबाने दिला आहे. संपूर्ण गणेशोत्सवाच्या निमित्ताने शेतातील मातीपासून सव्वा फूट, एक फूट अशा विविध आकाराच्या 3 गणेशमूर्तींची त्यांनी निर्मिती केली आहे. गणेश मूर्तींची निर्मिती करताना अथर्वशीर्ष पठण व धार्मिक पूजापाठ केला जात असल्याचे ते सांगतात.

''संपूर्ण जगातील विविध देशात गणेश उपासक पाहायला मिळतात सर्व ठिकाणच्या संस्कृती परंपरा वेगवेगळ्या असल्या तरी भक्ती एकच असल्याचं या संपूर्ण कुटुंबाचा मानस आहे. २७ -२८ वर्षांपासून या कुटुंबाने या उत्सवाची परंपरा कायम ठेवली आहे.

''आम्ही मातीचा गणपती बनवतो. आम्हाला कोणी शिकवलाही नाही किंवा आम्ही फोटोत पाहून तयार करत नाहीत. आम्हाला वेगळा आनंद मिळतो''
- निर्मल अनुराग आबनावे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UAPA: ओसामा बिन लादेनचे फोटो, ISIS चे झेंडे बाळगणे गुन्हा नाही: हायकोर्ट

MS Dhoni : अखेर सत्य आले समोर! रणनीती नाही तर... या कारणामुळे ९व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी आला 'थाला'

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Met Gala 2024 : परी म्हणू की सुंदरा! रेड कार्पेटवर ईशाचाच जलवा, स्पेशल फ्लोरल ड्रेस बनवण्यासाठी लागले तब्बल 10 हजार तास

SCROLL FOR NEXT