पुणे

ग्रामपंचायत लढती आज स्पष्ट होणार;उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी सोमवारी ४ जानेवारी ही उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होणार आहे. तसेच, उद्या दुपारी तीन वाजल्यानंतर लगेचच उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे उद्यापासून खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात होणार असून, गावगाड्याच्या राजकारणाला रंगत येणार आहे.  

ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गाव पुढाऱ्यांनी आपापल्या पॅनेलच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज ३० डिसेंबरच्या दिलेल्या मुदतीत सादर केले होते. छाननीत आपल्या पॅनेलच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले तर त्याला डमी म्हणून भरलेल्या पर्यायी उमेदवाराचे उमेदवारी अर्जही मागे घेतले जाणार आहेत. त्याचबरोबर भावकीत नातलगात वाद नको. म्हणूनही काही उमेदवारांचे अर्ज सोमवारी माघारी घेतले जाणार आहेत. तसेच ज्या प्रभागात अल्प मतावर निवडणुकीचा निकाल लागणार आहे. अशा प्रभागातील अपक्ष भरलेल्या उमेदवारांनाही गाव पुढारी पुढील वेळी संधी देऊ किंवा पुन्हा विचार करू असा शब्द देऊन त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्या दुपारी तीन वाजता ग्रामपंचायतींच्या गावोगावच्या प्रभागनिहाय निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्या प्रभागातील उमेदवारांच्या मतांच्या विजयाचे गणित, विजयासाठी लागणारी मते, बाहेर गावावरून मतदानासाठी आणावी लागणारी मते यांचा विचारही निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यावर उमेदवारांना करावा लागणार आहे. 

अर्थकारणाला गती

  •   आपापल्या प्रभागांत नाव, चिन्हासह फलक लावावे लागणार
  •   गावच्या मध्यवर्ती चौकात पॅनेलच्या प्रभागनिहाय सर्व उमेदवारांची नावे व चिन्हांसह बॅनर लावले जाणार
  •   डिजिटल बॅनर बनविणाऱ्यांना चांगले दिवस येणार 
  •   जाहीरनामा व केलेली कामे ध्वनिमुद्रित कॅसेटद्वारे ऐकविण्याचा ट्रेंड
  •   ध्वनिमुद्रित कॅसेट बनविणाऱ्या व्यावसायिकांनाही लाभ
  •   मतपत्रिकेचा नमुना, आवाहनासाठी प्रिंटिंग प्रेसचालकांना अच्छे दिन

    पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT