leopard Dies in Accident in Ambegaon Village 
पुणे

भरधाव वाहनासमोर बिबट्या आला अन्...

सकाळ वृत्तसेवा

महाळुंगे पडवळ : ‘‘आंबेगाव तालुक्यातील लौकी ते थोरांदळे रस्त्यावर पाझर वस्तीजवळ सहा महिन्याच्या बिबट्या सोमवारी (ता.२३) पहाटे अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाला आहे,’’ अशी माहिती वनपाल नारायण आरुडे यांनी दिली
.
Video : कुत्र्याला पळविणारा बिबट्या सीसीटीव्हीत कैद 

लौकी पंचक्रोशीत पाझरवस्तीनजीक सीताराम किसन थोरात, ज्ञानेश्वर नाथा पडवळ व विनोद शिवराम थोरात, सुनील शिवराम थोरात यांनी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. सरपंच संदेश थोरात यांनी वनपाल नारायण आरुडे यांनी सदर घटनेची माहिती कळविली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनरक्षक कल्पना पांढरे, राजेंद्र गाढवे, वनसेवक कोंडीभाऊ डोके व कैलास दाभाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला आहे. चांडोली बुद्रूकचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय कोल्हे यांनी शवविच्छेदन केले आहे. अवसरी-पेठ घाट येथे अग्निदहन केले.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांना पुण्यात जिल्हाबंदी 

याबाबत नारायण आरुडे म्हणाले, ‘‘सदर बिबट्याचे वय सर्वसाधारणपणे ६ महिने असून मादी जातीचा आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याला गंभीर दुखापत झाल्याने तो जागीच मृत्यू झाला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

America Car Culture : अमेरिकेत मर्सिडीज-बीएमडब्ल्यू पाहून श्रीमंत समजू नका! भारतीय तरुणाने सांगितलं धक्कादायक वास्तव, पाहा VIRAL VIDEO

Dusseldorf Ganeshotsav : ड्युसेलडॉर्फमध्ये गणरायाची भव्य मिरवणूक; ढोल-ताशांच्या गजरात रंगला मराठमोळा उत्सव

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

SCROLL FOR NEXT