Leopard
Leopard 
पुणे

सोशल मीडियावर बिबट्याचा धुमाकूळ 

डी. के. वळसे पाटील

पुणे नेटकऱ्यांच्या कारनाम्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण; जुने व्हिडिओ व्हायरल
मंचर - आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्‍यात पट्टेरी वाघ व तीन पिल्ले फिरत असल्याचे तसेच हरिण पकडून झाडावर बिबट्या चढत असल्याची व बिबट्याने एक तरुणावर हल्ला करून त्याला सोडून दिले अशा अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भागात पट्टेरी वाघच नसल्याचा खुलासा वनखात्याला करावा लागला. मात्र, काही वेळातच ही अफवा असल्याचे समोर आले. सोशल मीडियावर सध्या नेटकऱ्यांनी बिबट्याचा धुमाकूळ वाढविला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आंबेगाव, खेड, जुन्नर व शिरूर तालुक्‍यातील बहुतांशी गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून सोशल मीडियावर जुने व नवीन व्हिडिओ टाकून नेटकऱ्यांनी नुसता धुरळा 
उडवून दिला आहे. 

व्हिडिओ पाहून आपल्याच परिसरात बिबट्या सापडला आहे. नेटकरी असे व्हिडिओ स्टेटसला आणि व्हॉटसॲप ग्रुपला पाठवत आहे. यातून गैरसमज पसरत आहेत. नेटकरी यांनी स्टेटसला किंवा व्हॉट्‌सॲप ग्रुपला असे जुनी व्हिडिओ टाकून लोकांमध्ये गोंधळ उडवून घबराटीचे वातावरण पसरवले आहे. नेटकरी यांनी सामाजिक भावनेतून गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे, असे चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील शेतकरी अर्जुन मारुती थोरात यांनी सांगितले.

बिबट्या मनुष्यावर तर कधी पाळीव प्राण्यांवर दिवसा, रात्री-अपरात्री हल्ले करू लागला आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनखात्याची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्यांना पुरेशा प्रमाणात पिंजरे उपलब्ध करून दिले जात नाहीत. शेतकऱ्यांना रात्रीचे शेतीला पाणी देणे अवघड झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना एमआयडीसीप्रमाणे दिवसा व रात्रीही विजेची व्यवस्था करावी.
- उषा कानडे, माजी सभापती, आंबेगाव तालुका पंचायत समिती

जुन्नर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात पट्टेरी वाघ नाहीत. सोशल मीडियावर व्हायरल झालेले अनेक व्हीडीओ मराठवाडा, विदर्भ व परराज्यातील आहेत. जुने व्हीडीओ पाहून गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण होते. खात्री केल्याशिवाय विनाकारण बिबट्याचे व्हीडीओ व्हायरल करू नयेत.
- अजित शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी मंचर (ता. आंबेगाव)  

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT