bacchu kadu.jpg 
पुणे

एमआयटीची सीबीएसई एनओसी रद्द करण्याचे राज्यमंत्री बच्चू कडू यांचे पत्र

जितेंद्र मैड

कोथरूड (पुणे) : कोथरूड येथील माईस एमआयटी विश्वशांती गुरुकूल शाळेची सीबीएसई एनओसी रद्द करण्यात यावी असे पत्र राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी काल शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे अपर मुख्य सचिवां यांना दिले आहे. राज्यमंत्री कडू यांनी 26 जून रोजी सुनवाई घेतली होती. त्यावर उपसंचालकांनी सादर केलेला वस्तुस्थिति अहवाल आणि शिक्षण संचालक (प्राथमिक) यांची शिफारस व इतर बाबी पाहून सीबीएसई एनओसी रद्द करावी असे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रात म्हटले आहे. या निर्णयाचे पालकांनी स्वागत केले. दरम्यान, एमआयटी शिक्षण समुहाने मात्र असे कोणतेही पत्र आलेले नसून पत्राच्या अधिकृततेबद्दल शंका उपस्थित केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
शाळेने यावर्षी सर्व एसएससी बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद करून विद्यार्थ्यांना सीबीएसई घ्या किंवा शाळा सोडून जा असे सांगितले होते. शाळेने एसएससी बोर्ड बंद केल्यामुळे एसएससी बोर्ड इंग्रजी माध्यमाचे आठशेहून अधिक विद्यार्थी गेले दोन महिने ऑनलाइन शिक्षणापासून वंचित होते. गेली अडीच वर्ष पालक शाळेच्या निर्णया विरोधात वेळोवेळी आवाज उठवत होते. शाळेने पहिलीपासून एक एक वर्ष सीबीएसई सुरु करावे. आमची मुले एसएससी बोर्ड मधून पास होऊन द्यावीत, अशी पालकांची मागणी होती. शाळेने मनमानी करत   स्वीच ओव्हर कॅटेगरीत शासनाची फसवणूक करून सीबीएसई मान्यता मिळवली आणि पूर्ण एसएससी बोर्ड इंग्रजी माध्यम एकदम बंद केले. शाळेवर प्रशासक नेमून एसएससी इंग्रजी माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण मिळेल, अशी आशा पालक प्रतिनिधी संजय जोशी यांनी व्यक्त केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

एमआयटी शिक्षण समुहाच्या कार्यकारी संचालक स्वाती कराड चाटे म्हणाल्या,  ही चुकीची माहिती आहे. असे कुठलेही अधिकृत पत्र आमच्याकडे आलेले नाही. प्रशासकीय पातळीवरील हे पत्र पालकांकडे कसे आले? या पत्राची अधिकृतता तपासायला हवी. काही पालक शाळेची बदनामी करत आहेत. आमची संस्था जुनी असून सर्व काही नियमाप्राणे होत आहे. सीबीएसई सुरू करणे गुन्हा नाही. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित ठेवलेला नाही . कोणीही काही क्लेम करत असेल, तर त्यातील प्रत्येक मुद्द्यांवर आपण शिक्षण विभागाला, सचिवांना सर्व स्पष्टीकरण दिले आहे. शिक्षण विभागाने ऑनलाईन सुनावणी घेतली होती. त्यावेळी आमचे एनओसी रद्द होऊ शकत नाही, याबद्दल खुलासा तपशीलवार झाला आहे. संस्थेनीही सर्व खुलासा केला आहे. आमची जुनी शाळा आहे. आम्ही सगळ्या पालकांना सरसकट अॅक्सेस दिलेला आहे. जे पालक तो अॅक्सेस वापरत आहेत, त्यांना त्याचा फायदा मिळतो आहे. यासंदर्भात मिसगाईड केले जात आहे. त्यातून मुलांचे नुकसान होऊ शकते.

सामान्य विद्यार्थी व पालकांना वेठीस धरून त्यांच्यावर अन्याय करणाऱ्यांवर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेला हा प्रहार आहे. 

-गजेंद्र पाटील, पालक

  • एकाच इमारतीत विविध बोर्डाच्या शाळा चालू असणे हे सीबीएसई कायद्याचे उल्लंघन आहे.
  • शाळेने शासनाची दिशाभूल करून सीबीएसई एनओसी मिळवली. हेतूपुरस्सर फी वाढीसाठीच स्वीच ओव्हर कॅटेगरीमध्ये मान्यता मिळवली.
  • सीबीएसई एनओसी देताना कोणतीही शहानिशा करण्यात आली नाही. अगदी पत्ता बदलला तरी.
  • एसएससी बोर्ड पूर्णपणे बंद केल्याने आठशेहून अधिक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित असून बाल शिक्षणाच्या  कायद्याचा हा भंग आहे.
  • आरटीईमधून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून सीबीएसई फाॅर्म भरून घेतले. गणवेश व पुस्तकाकरता पैसे आकारले
  • मागील वर्षी पालक शिक्षक संघ स्थापन केला नाही. 2018-19 वर्षात एकतर्फी फी वाढ केली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जुबेर हंगरगेकरला आज पुन्हा न्यायालयात नेले जाणार! ‘वाहदते मुस्लिम- ए- हिंद’च्या सोलापुरातील पदाधिकाऱ्यास ‘ATS’ची नोटीस, कुंभारीजवळील शाळेतील कार्यक्रमाचे तेच होते आयोजक

ढिंग टांग : जल बिन मछली, नृत्य बिन बिजली..!

वेट ट्रेनिंगकडे दुर्लक्ष नकोच

दृष्टिकोनातील बदलाचा प्रवास

लवचीक व्यक्तिमत्त्व

SCROLL FOR NEXT